बर्थडे गर्ल दीपिकाबद्दलच्या या रंजक गोष्टी माहीत आहेत का?

By Admin | Updated: January 5, 2017 11:45 IST2017-01-05T11:27:00+5:302017-01-05T11:45:00+5:30

बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही यशस्वी बस्तान बसवण्यास सज्ज असलेली सौंदर्यवती अभिनेत्री दीपिका पडूकोणचा आज वाढदिवस...

Do you know these interesting things about Birthday Girl Deepika? | बर्थडे गर्ल दीपिकाबद्दलच्या या रंजक गोष्टी माहीत आहेत का?

बर्थडे गर्ल दीपिकाबद्दलच्या या रंजक गोष्टी माहीत आहेत का?

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - दशकभरापूर्वी साहरूखसोबत ' ओम शांती ओम' चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी दीपिका पडूकोण आजची आघाडीची अभिनेत्री बनली आहे. सुरूवातीच्या काळात रोमँटिक चित्रपटांच्या गर्तेत अडकलेल्या दीपीकाला साचेबद्ध, गुडीगुडी हिरॉईनच्या भूमिका कराव्या लागल्या ख-या. मात्र त्याच प्रतिमेत न अडकून पडता तिने लव्ह आज कल, कॉकटेल, फाईंडिंग फॅनी, ये जवानी है दिवानी,  पिकू, बाजीराव मस्तानी, तमाशा अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिकाही केल्या. बॉलिवूडप्रमाणेच ती आता हॉलिवूडमध्येही यशस्वी बस्तान बसवण्याच्या तयारीत असून लवकरच ती ' xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून विन डिझेलसह पदार्पण करणार आहे. बॉलिवूडच्या या सौंदर्यवतीचा आज (५ जानेवारी) ३१ वा वाढदिवस.. त्या निमित्ताने तिच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊया...
 
> दीपिका ही भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असून ती तरूणांच्या गळ्यातील ताईत आहे. मात्र तिचा जन्म भारतात नव्हे तर डेन्मार्कमधील कोपहेगन येथे झाला आहे. 
 
> विख्यात बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पडूकोण यांची मुलगी असलेल्या दीपिकालाही  वडिलांप्रमाणेच बॅडमिंटनची आवड आहे, तर तिची बहीण अनिशा ही गोल्फ चँपियन आहे. 
 
 
> कोरिओग्राफर- दिग्दर्शक फराह खान हिने दीपिकाला ' ओम शांती ओम'मधून ब्रेक दिला असे ब-याच जणांना वाटते. मात्र फराहच्या आधी गायक-संगीतकार हिमेश रेशमियाने दीपिकाला सिल्व्ह्र स्क्रीनवर पदार्पण करण्याची संधी दिली. ' नाम है तेरी' या हिमेशच्या पॉप्युलर व्हिडीओमध्ये दीपिका झळकली आणि तो व्हिडीओ पाहूनचन फराहने तिला चित्रपटात कास्ट केले.
 
> दीपिका आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ' रामलीला' , ' बाजीराव - मस्तानी' यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत आणि भन्साळींच्या आगामी ' पद्मावती' या महत्वाकांक्षी चित्रपटातही दीपिका प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का, की दीपिका  फराहच्या ' ओम शांती ओम'मधून नव्हे तर संजय लीला भन्साळी यांच्याच ' सांवरिया' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार होती. मात्र भन्साळी यांन दीपिकाऐवजी अनिल कपूरची मुलगी सोनमला कास्ट केले. विशेष म्हणजे ' ओम शांती ओम' आणि ' सावरियां' हे दोन्ही चित्रपट २००७ साली दिवाळीत एकाच दिवशी प्रदर्शित झाले, आणि तेव्हापासूनच दीपिक आणि सोनम यांच्यात अघोषित दुश्मनी सुरू झाली, जी अजूनही सुरूच आहे. 
 
> ब-याच जणांना माहीत नसेल पण दीपिका ही हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात अभिनेते-दिग्दर्शक गुरूदत्त यांची नातेवाईक आहे. गुरूदत्त यांचे मूळ नाव होते वसंत पडूकोण..
 
> सर्वसामान्य तरूणींप्रमाणेच दीपिकालाही शॉपिंगची खूप आवड आहे, मात्र तिला उंची वस्तू, मेकअण अॅक्सेसरीज, फॅशनेबल कपडे यापेक्षाही घरातील उपयोगी सामान खरेदी करायला आवडते. 
 
> एखाद्या दिवशी मान मोडेस्तोवर काम केल्यानंतर दीपिकाला स्वत:लाच चॉकलेटची ट्रीट द्यायला आवडतं.
 
> दीपिका आणि अभिनेता रणवीर सिंगच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र त्याआधी निहार पंड्या आणि चित्रपटसृष्टीत आल्यावर अभिनेता रणबीर कपूरसोबत सिरीयस रिलेशनशिपमध्ये होती. विशेष म्हणजे रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतरच तिला 'डिप्रेशन'चा सामना करावा लागला. आपण बराच काळ नैराश्यात होतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी थेरपीही घेतल्याचे कबूल करत दीपिकानेच या आजाराबद्दल उघड भाष्य केले. 

Web Title: Do you know these interesting things about Birthday Girl Deepika?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.