स्वत:ला पडद्यावर पाहणे आवडत नाही
By Admin | Updated: March 31, 2017 05:08 IST2017-03-31T05:08:22+5:302017-03-31T05:08:22+5:30
प्रत्येक अभिनेत्री रुपेरी पडद्यावर किंवा छोट्या पडद्यावर सतत काम करत राहावे, आपला अभिनय लाखोंच्या

स्वत:ला पडद्यावर पाहणे आवडत नाही
प्रत्येक अभिनेत्री रुपेरी पडद्यावर किंवा छोट्या पडद्यावर सतत काम करत राहावे, आपला अभिनय लाखोंच्या संख्येने रसिकांपर्यंत पोहचावे, अशी इच्छा असते. मात्र, एका अभिनेत्री विषयी तिच्या चाहत्यांना एक गोष्ट माहिती नसावी. ती म्हणजे अभिनेत्री स्नेहा वाघला स्वत:ला पडद्यावर पाहायलाच आवडत नाही. ती ज्या मालिकांमध्ये किंवा सिनेमात काम करते, त्या मालिकेत ती स्वत: झळकत असल्यामुळे ती मालिका किंवा सिनेमा पाहणे ती टाळत असते. त्यामुळे ती या मालिकेत किंवा या सिनेमात काम करत असल्याचेही कानोकान खबरही लागू देत नसल्याचे समजतंय.