पैशांसाठी चित्रपट करीत नाही
By Admin | Updated: September 10, 2014 05:46 IST2014-09-10T05:46:11+5:302014-09-10T05:46:11+5:30
पैशासाठी चित्रपटात काम करीत नसल्याचे दीपिका पदुकोणने म्हटले आहे. मागील वर्षी दीपिकाचे ‘रेस-२’,

पैशांसाठी चित्रपट करीत नाही
पैशासाठी चित्रपटात काम करीत नसल्याचे दीपिका पदुकोणने म्हटले आहे. मागील वर्षी दीपिकाचे ‘रेस-२’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘गोलियो की रासलीला रामलीला’ हे सुपरहिट चित्रपट रिलीज झाले आहेत. या चित्रपटांच्या ब्लॉकबस्टर यशानंतर दीपिका आता बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सहभागी झाली आहे. दीपिका या चित्रपटांच्या यशानंतर चित्रपट निवडताना पैशांचा नव्हे, तर चित्रपटाच्या यशाचा विचार करते. दीपिका सांगते की ती फक्त चित्रपटाच्या स्क्रिप्टचा विचार करते. चित्रपटाचे स्क्रिप्ट जर तिला आवडले, तरच तो चित्रपट स्वीकारते. दीपिकाने कमी बजेटच्या ‘फाइंडिंग फॅनी’ला होकार दिला. कारण तिला या चित्रपटाची आयडिया आवडली. होमी अडजानियाचे दिग्दर्शन असलेल्या ‘फायडिंग फॅनी’ या चित्रपटात दीपिकासह अर्जुन कपूर, नसिरुद्दीन शाह, डिंपल कपाडिया आणि पंकज कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला रिलीज होत आहे.