ही दिवाळी भारतीय सैन्यासाठी

By Admin | Updated: November 2, 2016 02:28 IST2016-11-02T02:28:42+5:302016-11-02T02:28:42+5:30

उरी येथील हल्ल्याने देशातील संपूर्ण नागरिकच काय पण सेलिब्रिटीदेखील हादरून गेले आहेत.

This Diwali for the Indian Army | ही दिवाळी भारतीय सैन्यासाठी

ही दिवाळी भारतीय सैन्यासाठी


उरी येथील हल्ल्याने देशातील संपूर्ण नागरिकच काय पण सेलिब्रिटीदेखील हादरून गेले आहेत. दिवाळीनिमित्त अनेकांनी वेगवेगळे संकल्प केले आहेत. पण जॉन अब्राहमने मात्र ही दिवाळीच शहिदांसाठी अर्पण केली आहे. याविषयी तो सांगतो, ‘एक दिया शहिदों के नाम... दिवाली पर वीरता को सलाम, शहिदों का दिया...’ उरी हल्ला, सर्जिकल स्ट्राईक या सर्व घटनांसाठी भारतीय सैन्याला शथीर्चे प्रयत्न करावे लागले. भारतीय सैन्याचे आभार मानताना जॉन म्हणतो, ‘भारतीय सैन्याला मी खरा हिरो मानतो. दिवाळीसारख्या सणांवेळी आपण घरांमध्ये कुटुंबियांसमवेत हा सण साजरा करत असतो. त्यावेळी सीमेवर भारतीय सैन्य जीवाचे रान करून लढत असतात. आपल्याप्रमाणे त्यांनाही वाटते की, आपण घरच्यांसोबत सण साजरा करावा. पण त्यांना शक्य होत नाही. राष्ट्राचे संरक्षण हाच त्यांच्यासाठी खरा सण असतो. म्हणून सैनिकांनो तुमच्या कर्तव्यपूर्तीला आणि क्षमतेला सलाम. जय हिंद, जय हिंद की सेना!!’

Web Title: This Diwali for the Indian Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.