डायट विसरते बिपाशा बसू

By Admin | Updated: November 29, 2014 23:18 IST2014-11-29T23:18:16+5:302014-11-29T23:18:16+5:30

फिल्मी जगतातील सर्वच अभिनेत्री त्यांच्या फिटनेसबाबत जास्तच जागरूक असतात. त्यामुळे हेवी वर्कआऊटशिवाय डायटवरही त्यांचे विशेष लक्ष असते.

Dit forgets Bipasha Basu | डायट विसरते बिपाशा बसू

डायट विसरते बिपाशा बसू

फिल्मी जगतातील सर्वच अभिनेत्री त्यांच्या फिटनेसबाबत जास्तच जागरूक असतात. त्यामुळे हेवी वर्कआऊटशिवाय डायटवरही त्यांचे विशेष लक्ष असते. डाएट म्हटले तर मिठाई वजर्च; पण बॉलीवूडची बिनधास्त अभिनेत्री बिपाशा बासू इतरांपेक्षा काहीशी वेगळी आहे. फिटनेससाठी ती जीममध्ये खूप घाम गाळते; पण मिठाई पाहिली, तर तिचे स्वत:वर नियंत्रण राहत नाही. मिठाईबाबतचे प्रेम बिपाशाने ट्विटरवर जाहीर केले आहे. तिने ट्विट केले की, बंगाली असल्याने मिठाईला नाही म्हणणो अवघड आहे, युद्ध सुरू आहे. पाहूयात मी किती दिवस गोड पदार्थापासून लांब राहते ते.’ बिपाशा नुकतीच चर्चेत राहिली ते हरमन बावेजाशी झालेल्या ब्रेकअपमुळे. 

 

Web Title: Dit forgets Bipasha Basu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.