दीपिकाला आजारी पाडणार हा दिग्दर्शक

By Admin | Updated: September 29, 2014 06:18 IST2014-09-29T06:18:25+5:302014-09-29T06:18:25+5:30

प्रसिद्ध दिग्दर्शक होमी अदजानिया हा ‘डिम्पल गर्ल’ दीपिका पदुकोणला घेऊन आणखी एका चित्रपटाची निर्मिती करण्याच्या विचारात आहे

The director is going to make Deepika ill | दीपिकाला आजारी पाडणार हा दिग्दर्शक

दीपिकाला आजारी पाडणार हा दिग्दर्शक

प्रसिद्ध दिग्दर्शक होमी अदजानिया हा ‘डिम्पल गर्ल’ दीपिका पदुकोणला घेऊन आणखी एका चित्रपटाची निर्मिती करण्याच्या विचारात आहे. होमीने दीपिकासोबत ‘कॉकटेल’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फायंडिंग फनी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘द फाल्ट इन पॉवर स्टार्स’ या चित्रपटाचा हिंदीत रिमेक बनविण्याची होमीची इच्छा आहे. त्यासाठी तो जोरदार तयारीला लागला आहे.
‘द फाल्ट इन पॉवर स्टार्स’ हा आजारी असणाऱ्या तरुण-तरुणीची कथा आहे. ते एकमेकांवर निस्सिम प्रेम करीत असतात. या चित्रपटासाठी दीपिका आणि वरुण धवन यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. हॉलीवूडमध्ये या चित्रपटाने १,८०० कोटी रुपयांची कमाई केली होती. पूर्वी करण जोहर हा चित्रपट बनवणार होता; परंतु यश आले नाही. होमीच्या चित्रपटाची शूटिंग मार्चमध्ये सुरू होईल.

Web Title: The director is going to make Deepika ill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.