दिलजीत झाला ‘झिगांट’

By Admin | Updated: March 27, 2017 05:04 IST2017-03-27T05:04:33+5:302017-03-27T05:04:33+5:30

फिल्लोरी या चित्रपटात दिलजीत दोसांज प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटात तो अनुष्का शमार्सोबत झळकत आहे

Diligat happened 'Zigant' | दिलजीत झाला ‘झिगांट’

दिलजीत झाला ‘झिगांट’

फिल्लोरी या चित्रपटात दिलजीत दोसांज प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटात तो अनुष्का शमार्सोबत झळकत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो नुकताच लोकमतच्या आॅफिसमध्ये आला होता. दिलजीत हा मुळचा पंजाबी असून त्याने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो पंजाबी असला तरी त्याला मराठी चित्रपटांविषयी प्रेम आहे. सैराट हा तर त्याचा आवडता चित्रपट आहे. सैराटमधील सगळीच गाणी त्याला प्रचंड आवडतात. पण त्यातही झिंगाट या गाण्याचा तो चाहता आहे. हे गाणे त्याने लोकमतच्या आॅफिसमध्ये सगळ्यांना गावून दाखवले. दिलजीतला मराठी येत नसले तरी झिंगाट या गाण्याचे बोल मोबाइलमध्ये वाचत त्याने हे गाणे गायले. दिलजीत झिंगाट गाताना स्वत: झिंगाट झाला होता. त्याने हे गाणे अप्रतिम गायले.

Web Title: Diligat happened 'Zigant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.