पुन्हा शाळेत जाण्याची करिनाची इच्छा

By Admin | Updated: September 7, 2014 00:48 IST2014-09-07T00:48:54+5:302014-09-07T00:48:54+5:30

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूरला लहानपणी शाळेत जायला आवडत नसे, सरासरी दर्जाची विद्यार्थिनी असल्याने करिनाला अभ्यासात नेहमीच समस्या येत असे.

The desire to go to school again | पुन्हा शाळेत जाण्याची करिनाची इच्छा

पुन्हा शाळेत जाण्याची करिनाची इच्छा

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूरला लहानपणी शाळेत जायला आवडत नसे, सरासरी दर्जाची विद्यार्थिनी असल्याने करिनाला अभ्यासात नेहमीच समस्या येत असे. भारतात शिक्षणासाठी युनिसेफची सेलिब्रिटी दूत असलेल्या करिनाच्या मते लहानपणी तिला शिक्षकांकडून फारसे महत्त्व मिळाले नाही. कारण ती कधीच वर्गात पुढच्या बाकावर बसत नसे. करिना म्हणाली की, ‘शाळेत जाण्यासाठी आई मला दररोज सहा वाजता उठवत असे आणि माङो तिला दररोज उत्तर असे, आणखी एक तास. वयाच्या दहाव्या वर्षी मला वाटत होते की, माङया शाळेचे दप्तर खूप जड आहे. मी वर्गात झोपून जात असे, सरासरी विद्यार्थी असल्याने मला शाळेत भाव मिळत नसे. आता मात्र करिनाला पुन्हा एकदा शाळेत जायची इच्छा आहे.

 

Web Title: The desire to go to school again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.