हृतिक-कॅटरिनाची मागणी वाढली

By Admin | Updated: September 15, 2014 04:51 IST2014-09-15T04:51:41+5:302014-09-15T04:51:41+5:30

हृतिक रोशन आणि कॅटरिना कैफ यांची जोडी पडद्यावर फारच आकर्षक दिसते;

Demand for Hrithik-Katrina | हृतिक-कॅटरिनाची मागणी वाढली

हृतिक-कॅटरिनाची मागणी वाढली

हृतिक रोशन आणि कॅटरिना कैफ यांची जोडी पडद्यावर फारच आकर्षक दिसते; मात्र ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या एकमेव चित्रपटात या जोडीने काम केले आहे. आता ‘बँगबँग’च्या निमित्ताने ते पुन्हा एकत्र येत आहेत. ‘बँगबँग’च्या पोस्टरवर दोघांमधील केमिस्ट्री लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळेच अनेक निर्माते हृतिक आणि कॅटरिना यांच्याकडे बारकाईने बघत आहेत. दोघांना घेऊन चित्रपट तयार करण्याची योजना काही निर्माते बनवीत आहेत. हृतिक आणि कॅटरिना यांना घेऊन एक चित्रपट बनविण्याची योजना जोया अख्तरने हाती घेतली आहे. ‘रोड’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. अभय देओल आणि फरहान अख्तर देखील या चित्रपटात भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Demand for Hrithik-Katrina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.