दीपिका शिकतेय तलवारबाजी
By Admin | Updated: February 4, 2015 01:26 IST2015-02-04T01:26:37+5:302015-02-04T01:26:37+5:30
केरळमधील कलरिपयट्टूचे प्रशिक्षण अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून घेते आहे.
दीपिका शिकतेय तलवारबाजी
केरळमधील कलरिपयट्टूचे प्रशिक्षण अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून घेते आहे. दीपिकाला ‘बाजीराव मस्तानी’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकायची आहे. याचे ट्रेनिंग सध्या ती रोहित शेट्टीच्या टीमकडून घेत आहे. रोहित शेट्टी आपल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील आवडत्या जोडीसोबत पुन्हा काम करण्यास उत्सुक असला तरी सध्या त्याने केवळ शाहरुखसोबत काम करणे पसंत केले आहे. लवकरच या
चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.