दीपिकाने इथेही बाजी मारली, या गोष्टीसाठी बनली आशियात नंबर वन
By Admin | Updated: October 2, 2016 08:07 IST2016-10-02T08:07:46+5:302016-10-02T08:07:46+5:30
बॉलीवूडची डिंपल गर्ल अर्थात 'मस्तानी'ने एक नवा विक्रम करत आपल्या प्रतीस्पर्धी अभिनेंत्रीना माघे टाकत एक नवा विक्रम केला आहे.

दीपिकाने इथेही बाजी मारली, या गोष्टीसाठी बनली आशियात नंबर वन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ : बॉलीवूडची डिंपल गर्ल अर्थात 'मस्तानी'ने एक नवा विक्रम करत आपल्या प्रतीस्पर्धी अभिनेंत्रीना माघे टाकत एक नवा विक्रम केला आहे. आणि ती आशिया खंडात अग्रक्रमांकावर विराजमान झाली आहे. दीपूने ट्विटर फॅन फॉलोविंगप्रकरणात एक नवीन इतिहास रचत फालोवर्सच्या बाबतीत नंबर वनचा किताब मिळवला आहे.
बॉलिवुडमध्ये आपले बस्तान बसवल्यानंतर दीपिका पदुकोण आता तिच्या आगामी ': ळँी फी३४१ल्ल ङ्मा ंल्लीि१ उँी' या हॉलिवूडपटासाठी चर्चेत आहे. सध्या दीपिकाचे ट्विटरवर १६.१ मिलियन अर्थात एक कोटी साठ लाख येवढे फॉलोवर्स आहेत. आशियात ट्विटरवर कुठल्याही महिलेला फॉलो करण्याच्या बाबतीत आता दीपिका पहिल्या स्थानावर आहे. दीपिकाने आपल्या या नवीन पराक्रमामुळे इंडोनेशियन स्टार अग्नेजला मागे सोडले आहे. ट्विटरवर 'मो'चे आता १५.८ मिलियन फालोवर्स आहेत. तर बॉलिवूडची बबली गर्ल प्रियंका चोप्राचे १५.२ मिलियन फॉलोवर्स आहेत. दीपिकाचे ट्विटर फॉलोविंग वाढण्यामागे फक्त तिच्या चित्रपटाची कथा नव्हे तर ट्विटरच्या लाइव्ह चॅटमध्ये तिचे सक्रिय भाग घेणे, आपल्या फॅन्सची इच्छा पूर्ण करणे आणि खास मोक्यावर लोकांना स्वत: अभिनंदन करण्याची सवय आहे.
तसं तर दीपिका काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये नंबर वन बनली आहे. पीकू सारखे चित्रपटात उत्तम अभिनय, बाजीराव मस्तानीचे यश, ढेर सारे अवार्ड आणि आता हॉलिवूडचे चित्रपट 'ट्रिपल एक्स- रिटर्न ऑफ़ एक्सजेंडर केज'मध्ये विन डीजलसोबत जोडी बनवून या 'शटल गर्ल'ने साबीत केले आहे आहे की ती मागे नाही आहे. नुकतेच फ़ोर्ब्स मॅगझिन ने दीपिकाला टॉप १० हाइएस्ट पेड एक्ट्रेस म्हणून निवडले, जी तिच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मस्तानीच्या रोलमध्ये वाहवा मिळवलेली दीपिका पदुकोण पद्मावतीमध्ये चित्तोडगडची राणी पद्मिनीची भूमिका करण्यास सज्ज झाली आहे.