पडद्यावरील ‘डॅड’चे क्रॉस कनेक्शन
By Admin | Updated: September 7, 2015 03:06 IST2015-09-07T03:06:53+5:302015-09-07T03:06:53+5:30
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आॅल इज वेल’मध्ये ऋषी कपूर यांनी अभिषेक बच्चनच्या वडिलांची भूमिका निभावली आहे. यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात ऋषी कपूर यांनी अभिषेक लहान

पडद्यावरील ‘डॅड’चे क्रॉस कनेक्शन
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आॅल इज वेल’मध्ये ऋषी कपूर यांनी अभिषेक बच्चनच्या वडिलांची भूमिका निभावली आहे. यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात ऋषी कपूर यांनी अभिषेक लहान असताना अमिताभ बच्चन याच्यासोबतच्या क्षणांची आठवण सांगितली. एखाद्या चित्रपटात आता अमिताभ यांनी रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका करावी, असे ऋषी यांना वाटते.
विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन बॉलिवूडमधील असे कलाकार आहेत ज्यांनी पडद्यावर एकमेकांच्या रिअल लाइफ मुलाच्या रिल लाइफ वडिलांची भूमिका साकारली आहे. अब्बास मस्तान यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला चित्रपट ‘प्लेअर’मध्ये विनोद यांनी अभिषेकच्या वडिलांची तर मिलन लथुरिया यांच्या ‘दीवार-लेटस् ब्रिंग अवर हीरोज बॅक’मध्ये अक्षय खन्ना याच्या वडिलांची भूमिका अमिताभ यांनी साकारली आहे.
अमिताभ हे सोनम किंवा सोनाक्षीच्या वडिलांची भूमिका साकारू शकतील; मात्र अनिल कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबतीत ही शक्यता कमी दिसतेय की ते अभिषेकच्या वडिलांची भूमिका निभावतील. अनिल शर्मा यांच्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ या चित्रपटात बच्चन यांनी बॉबी देओलच्या वडिलांची भूमिका केली होती. धर्मेंद्र हे अभिषेकच्या वडिलांची भूमिका करू शकतात. अशीच शक्यता पंकज कपूर यांच्याबाबतीतही आहे. एखाद्या चित्रपटात ते अभिषेकचे वडील तर अमिताभही शाहिदच्या वडिलांच्या भूमिकेत दिसू शकतील. अशा पद्धतीची स्थिती बॉलिवूडमध्ये सहजासहजी निर्माण होत नाही.
चित्रपट विश्लेषक विनोद मीरानी सांगतात, केवळ भूमिकेसाठी असे करणे अवघड ठरते. अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांना एकमेकांच्या मुलांच्या वडिलांची भूमिका करण्यास अनेक वर्षे लागली. ऋषी कपूर आॅल इज वेलमध्ये अभिषेकचे वडील बनले होते, मात्र अमिताभ रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत असतील किंवा नाही, हे सांगणे अशक्य आहे.
मीरानी याला केवळ योगायोग मानतात. जे दर्शक वेगवेगळ्या पिढीच्या इतिहासाचा एकमेकांशी असणारा संबंध आणि वर्तमान जाणण्याचा प्रयत्न करतात अशांसाठीच हा केवळ चर्चेचा विषय असू शकतो. चित्रपटातील कॅमेऱ्यासमोर नाती नसतात, केवळ भूमिका असतात, असे त्यांचे म्हणणे आहे.