सलमानकडून सोनाक्षीचा पत्ता कट
By Admin | Updated: August 19, 2014 22:41 IST2014-08-19T22:41:00+5:302014-08-19T22:41:00+5:30
सोनमची निवड तिचे वडील अनिल कपूर यांच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे.

सलमानकडून सोनाक्षीचा पत्ता कट
सूरज बडजात्यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात सलमान खानची हिरोईन म्हणून सोनाक्षी सिन्हा पहिली पसंती होती; पण पुढे हळूहळू सोनाक्षीऐवजी सोनम कपूरचे नाव ऐकण्यात येऊ लागले. सूरज बडजात्या या भूमिकेसाठी सोनाक्षीला फायनल करणार होते; पण सलमानने त्यांना फ्रेश जोडीचा सल्ला दिल्याने ऐनवेळी सोनाक्षीऐवजी सोनमला कास्ट करण्यात आल्याची बातमी आहे. अशा प्रकारे सोनाक्षीचा पत्ता या चित्रपटातून कट झाला. असेही म्हटले जाते की, सोनमची निवड तिचे वडील अनिल कपूर यांच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे. काही का असेना पण सोनाक्षीच्या हातातून एक बडय़ा बजेटचा चित्रपट गेला, तोही तिचा गुरू असलेल्या सलमानमुळे.