कॉंलेजातून थेट सिनेमात!
By Admin | Updated: February 17, 2015 23:07 IST2015-02-17T23:07:15+5:302015-02-17T23:07:15+5:30
मोठ्या पडद्याचे आकर्षण कॉंलेजवयीन मुलांना असतेच आणि आपणही पडद्यावर झळकावे अशी सुप्त इच्छाही त्यांच्या मनात असते.

कॉंलेजातून थेट सिनेमात!
मोठ्या पडद्याचे आकर्षण कॉंलेजवयीन मुलांना असतेच आणि आपणही पडद्यावर झळकावे अशी सुप्त इच्छाही त्यांच्या मनात असते. पण, ती इच्छा प्रत्यक्षात उतरतेच असे नाही. प्राजक्ता यादव या तरुणीची ही इच्छा मात्र ‘कट्टी-बट्टी’ या चित्रपटाद्वारे फलद्रूप होणार आहे. आता शिक्षण चालू असतानाच प्राजक्ता चित्रपटातही चमकणार आहे. तिच्याच वयाचा संदर्भ असलेल्या या गोष्टीत या प्राजक्ताच्या अभिनयाचा सडा पडणार आहे.