स्टार किड्स ठरतायेत कॉपीकॅट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 15:56 IST2017-06-26T01:17:13+5:302023-08-08T15:56:13+5:30
बॉलिवूडमध्ये वगेवेगळ्या सिनेमातून पदार्पण करणारे हे स्टारकिडस त्यांच्या पदार्पणाआधीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत

स्टार किड्स ठरतायेत कॉपीकॅट
बॉलिवूडमध्ये वगेवेगळ्या सिनेमातून पदार्पण करणारे हे स्टारकिडस त्यांच्या पदार्पणाआधीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत. सतत प्रकाशझोतात असणारे हे स्टार किड्स त्यांच्या फॅशन सेन्समुळेही खूप चर्चेत असतात. मात्र आता हे स्टारकिडस एका वेगळ्यांच कारणामुळे लाईमलाईटमध्ये येतात. कारण ते ठरतायेत कॉपीकॅट. पाहुयात, कोण आहेत ते स्टार किडस कोणाची करतात ते कॉपी....
कॅटी पेरी- सोनम कपूरचा रेड अंदाज
स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूरनेही तिची ड्रेसिंग स्टाईल सगळ्यांत हटके आणि उठून कशी दिसेल यांवर खूप मेहनत घेताना दिसते. प्रत्येक कार्यक्रमात सोनम हटेक ड्रेसिंग करत हजेरी लावते. ग्लॅमरस दुनियेत टिकून राहण्यासाठी फॅशन सेन्स हा हवाच पण कधी कधी हे कलाकार मंडळीही त्यांच्या आवडत्या सेलिब्रेटींच्या स्टायलिश लूकच्या प्रेमात पडतात आणि आपणही अशीच स्टाईल करावी या हव्यासापोटी चक्क स्टाईल कॉपी करतात. सोनमने कोण्या बॉलिवूड सेलिब्रेटीला कॉपी केलेले नाहीय तर चक्क कॅटी पेरीचीच ड्रेसिंग स्टाईल कॉपी केली.
आलिया -जेनिफर सेम टू सेम
लाखो तरूणांची धडकन असलेली आलिया भट्टचे लाखोंच्या घरात चाहते आहेत. तिच्या क्युटनेसमुळे आधीच सगळे तिच्यावर फिदा होतात. सिनेमातील तिच्या लूकविषयी तरी कितीतरी दिवाने होतात. जेव्हा कधी आलिया कोणत्या कार्यक्रमाला हजेरी लावते त्यावेळी तिच्या लूकविषयी चर्चा होणार नाही हे तर अशक्यच आहे. अशाच एका कार्यक्रमात रेड कार्पेटवर आलिया अवताच सगळे कॅमेरे तिच्याकडे वळले. पोजवर पोज देणा-या आलियाच्या फॅशनेबल लूकची चर्चा तर झाली खरी मात्र, त्यानंतर जोरदार टीकेचाही सामना आलियाला करावा लागला. कारण आलियाने त्या दिवशी परिधान केलेला ड्रेस चक्क जेनिफर लोपेझच्या ड्रेसिंग स्टाईलशी मिळता जुळता
होता.
जान्हवी-जुहैरचा ड्रेस मिळता जुळता!
सुहानाप्रमाणेच जान्हवी कपूरही बॉलिवूडचा डॅडी करण जोहरच्या सिनेमातून बॉलिवूडमधेय पदार्पण करणार असल्याच्या बातम्यांमुळे ती सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मॉम श्रीदेवीसह ती वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्येही हजेरी लावत असते. सध्या तरी तिचे आगामी प्रोजेक्ट व्यतिरिक्त ती ग्लॅमरस ड्रेसिंग लूकमुळे ती लाईमलाईटमध्ये असते. मात्र, जान्हवी सुध्दा कॉपीकॅट आहे. तिचे डिझाइन केलेले ड्रेस हे कोणाच्या तरी ड्रेसिंग स्टाईलची कॉपी असतात असे वारंवार बोलले जाते तसे झालेही एका कार्यक्रमात. जान्हवी काळ्या रंगाचा फ्लोरल वनपिस घालत कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी तिने परिधान केलेला वनपिस डिझायनर जुहैर मुरादच्या ड्रेसच्या डिझाईनशी खूप मिळताजुळता होता. जुहैरने एका रॅम्पवॉकवेळी असा ड्रेस परिधान केला होता.