कबूल है!
By Admin | Updated: February 17, 2015 23:08 IST2015-02-17T23:08:48+5:302015-02-17T23:08:48+5:30
इंडियाचा विक्रमवीर विराट कोहलीसोबत सुरू असलेल्या ‘इश्क-विश्क’च्या चर्चांना ‘पीके’फेम अनुष्का शर्माने पुष्टी दिली आहे.

कबूल है!
इंडियाचा विक्रमवीर विराट कोहलीसोबत सुरू असलेल्या ‘इश्क-विश्क’च्या चर्चांना ‘पीके’फेम अनुष्का शर्माने पुष्टी दिली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने विराटसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विराट-अनुष्का एकत्र फिरताहेत, विराटने अनुष्काच्या दिशेने केलेल्या ‘फ्लार्इंग किस’चीही चर्चा रंगली होती. परंतु, आता मात्र ‘मी विराटसोबत असलेल्या प्रेमप्रकरणाबाबत बोलणं टाळते. प्रेम हा माझ्या वैयक्तिक आयुष्याचा भाग आहे; आणि माझी पर्सनल स्पेस जपलेली मला आवडेल,’ असे अनुष्काने म्हटले आहे.