पसंद अपनी-अपनी

By Admin | Published: September 12, 2016 02:49 AM2016-09-12T02:49:34+5:302016-09-12T02:49:34+5:30

बॉलिवूडमध्ये आपल्याला बायोपिकचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. ‘एम.एस. धोनी, दंगल’ असे खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट पुढील काहीच महिन्यांत प्रदर्शित होणार आहेत.

Choice of their own | पसंद अपनी-अपनी

पसंद अपनी-अपनी

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये आपल्याला बायोपिकचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. ‘एम.एस. धोनी, दंगल’ असे खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट पुढील काहीच महिन्यांत प्रदर्शित होणार आहेत. तर, एका कुस्तीपटूच्या आयुष्यावर आधारित ‘सुलतान’ या चित्रपटाने नुकताच कोट्यवधींचा गल्ला बॉक्स आॅफिसवर जमवला. खेळाडूंवर अनेक चित्रपट बनवले जात असल्याने आपल्या आयुष्यावरदेखील चित्रपट बनवला जावा, अशी सध्या अनेक खेळाडूंची इच्छा आहे. तसेच, आपली भूमिका कोणत्या कलाकाराने साकारावी, ही निवडदेखील त्यांनी केलेली आहे. पाहू या कोणत्या कलाकाराने आपली भूमिका साकारावी, असे कोणत्या खेळाडूला वाटते. त्याचा घेतलेला हा आढावा...

सानिया मिर्झा- परिणिती चोप्रा :
सानिया मिर्झाने आपल्या खेळाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवली आहे. तिने इथवर पोहोचण्यासाठी केलेला संघर्ष, तिची यशस्वी कामगिरी, तिचे वैयक्तिक आयुष्य या सर्व गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी सानियाला तिच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ‘तुझ्या बायोपिकमध्ये तुझी भूमिका कोणी साकारावी?’ असे तिला विचारले असता क्षणाचाही विलंब न लावता तिने ‘परिणीती चोप्रा!’ असे उत्तर दिले होते. ती म्हणाली होती, ‘‘भविष्यात माझ्यावर चित्रपट बनवला गेला, तर त्यामध्ये परिणीती या माझ्या लाडक्या मैत्रिणीने माझी भूमिका साकरावी असे मला वाटते.’’ सानियाची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

ग्लेन मॅक्ग्रा - अक्षयकुमार :
आॅस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅक्ग्राच्या आयुष्यावरही चित्रपट येणार असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी तो म्हणाला होता, ‘‘माझी भूमिका हॉलिवूड स्टार ह्यूज जॅकमन पडद्यावर चांगल्या रीतीने साकारू शकतो. कारण तो आॅस्ट्रेलियाचा असून त्याला क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि बॉलिवूडमध्ये म्हणाल, तर माझ्या भूमिकेसाठी अक्षयकुमार हेच नाव योग्य असल्याचे मला वाटते.’’

सायना नेहवाल-दीपिका पदुकोण :
भारताची फुलराणी या नावाने ओळखली जाणारी बॅटमिंटनपटू सायना नेहवालला तिच्या बायोपिकमध्ये दीपिका पदुकोणने काम करावे, अशी इच्छा आहे. दीपिकाने तिची भूमिका साकारण्यामागे एक कारण असल्याचेही ती सांगते. दीपिकाचे वडील प्रसिद्ध बॅटमिंटनपटू असल्याने तिला या खेळाची सगळी माहिती आहे. तसेच तीही एक चांगली बॅटमिंटनपटू आहे. त्यामुळे ती सायनाच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल, असे तिचे म्हणणे आहे. तसेच, दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांच्याकडून सायनाने बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे दीपिकाच माझा जीवनप्रवास पडद्यावर चांगल्या रीतीने मांडू शकते, असे तिचे म्हणणे आहे.

शोएब अख्तर - सलमान खान :
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेदेखील आपल्या आयुष्यावर चित्रपट बनवला जावा, अशी इच्छा अनेक वेळा व्यक्त केली आहे. त्याच्या बायोपिकमध्ये त्याची भूमिका सलमान खाननेच साकारावी, असा त्याचा जणू हट्टच आहे. सलमानच त्याची भूमिका योग्य प्रकारे साकारू शकेल, असे त्याचे म्हणणे आहे.

Web Title: Choice of their own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.