चिन्मय उद्गिरकर धावमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 00:36 IST2017-04-19T00:36:56+5:302017-04-19T00:36:56+5:30
चिन्मय ‘धाव’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करत असून, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

चिन्मय उद्गिरकर धावमध्ये
चिन्मय ‘धाव’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करत असून, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट एक बायोपिक असून, एका मुसलमान उद्योगपतीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात मुसलमान उद्योगपतीची भूमिका चिन्मय साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या खेड येथे
सुरू असून, चिन्मयचा खूप वेगळा लूक प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. याविषयी चिन्मय सांगतो, ‘‘मी माझ्या कारकिर्दीत कधीच मुसलमान व्यक्तिरेखा साकारली नव्हती. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात मी एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटावर सध्या मी प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटातील भाषा ही थोडीशी गावाकडची असल्याने संवादावर खूप मेहनत घ्यावी लागत आहे. एका सामान्य माणसाचा एक प्रसिद्ध उद्योगपती बनण्याचा प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील माझा लूकदेखील
काहीसा वेगळा असणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण खेडसोबतच मुंबईत होणार आहे. तसेच चित्रपटातील काही भागांचे चित्रीकरण म्यानमारमध्येदेखील होणार आहे.’’