चिन्मय बनला लव्हगुरू
By Admin | Updated: May 8, 2016 02:36 IST2016-05-08T02:36:25+5:302016-05-08T02:36:25+5:30
‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेतील अभिनेता चिन्मय उद्गीरकर ‘झांगडगुत्ता प्रेमाचा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. ‘नांदा सौख्यभरे’

चिन्मय बनला लव्हगुरू
‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेतील अभिनेता चिन्मय उद्गीरकर ‘झांगडगुत्ता प्रेमाचा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेमुळे अतिशय शांत आणि समंजस अशा मुलाची त्याची इमेज लोकांमध्ये निर्माण झाली आहे, पण ‘झांगडगुत्ता प्रेमाचा’ या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळाच चिन्मय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तो या चित्रपटात इतरांना प्रेमाचे सल्ले देणार आहे. तो लव्हगुरूची भूमिका या चित्रपटात साकारणार असल्याचे त्याने सांगितले.