रितेश देशमुखच्या ‘फास्टर फेणे’चा मुहूर्त
By Admin | Updated: October 22, 2016 03:07 IST2016-10-22T02:53:35+5:302016-10-22T03:07:50+5:30
रितेश देशमुख लवकरच मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे, ही बातमी आम्ही तुम्हाला सांगितली होती. आता रितेशने या चित्रपटाची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली आहे.

रितेश देशमुखच्या ‘फास्टर फेणे’चा मुहूर्त
रितेश देशमुख लवकरच मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे, ही बातमी आम्ही तुम्हाला सांगितली होती. आता रितेशने या चित्रपटाची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली आहे. रितेश फास्टर फेणे या मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अमेय वाघ पाहायला मिळणार आहे. तर, क्षितिज पटवर्धनने या चित्रपटाची कथा लिहिली आहे. जेनेलियाने या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जेनेलियाने क्षितिज पटवर्धन, आदित्य सरपोतदार यांना एक छानसे पत्र लिहून ‘या चित्रपटाचा एक भागा झाला असल्याने तुमचे मी आभार मानते. या चित्रपटाच्या संपूर्ण प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा!’ अहो, एवढेच नाही तर चॉकलेटचे गिफ्टदेखील या पत्रासोबत तिने पाठविले आहे. जेनेलियाने पाठवलेल्या पत्रासाठी क्षितिजनेदेखील सोशल मीडियावर तिचे आणि रितेशचे आभार मानले आहेत. आता या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले आहे. लवकरच आपल्याला फास्टर फेणे मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. तेव्हाच समजेल या चित्रपटासाठी रितेश-जेनेलिय घेत असलेली मेहनत किती यशस्वी होतेय?