‘चीटर’चे शूटिंग मॉरिशसमध्ये

By Admin | Published: January 31, 2016 02:34 AM2016-01-31T02:34:52+5:302016-01-31T02:34:52+5:30

मराठी चित्रपटांचे शूटिंग मॉरिशसमध्ये झाल्याचे आश्चर्य वाटले असेल ना, किंवा हा काय चीटरपणा अशा काही भावनादेखील निर्माण झाल्या असतील. तर तो राग आनंदात व्यक्त करा.

'Cheater' shooting in Mauritius | ‘चीटर’चे शूटिंग मॉरिशसमध्ये

‘चीटर’चे शूटिंग मॉरिशसमध्ये

googlenewsNext

मराठी चित्रपटांचे शूटिंग मॉरिशसमध्ये झाल्याचे आश्चर्य वाटले असेल ना, किंवा हा काय चीटरपणा अशा काही भावनादेखील निर्माण झाल्या असतील. तर तो राग आनंदात व्यक्त करा. कारण मराठी चित्रपटाचे यश पाहता सध्या तर अशा आश्चर्याची आता सवय करून घेतली पाहिजे. असो, खरंच, हा कोणताही चीटरपणा नसून खरंच चीटर या मराठी चित्रपटाचे शूटिंग मॉरिशसमध्ये झाले असल्याचे अभिनेत्री पूजा सावंत हिने लोकमत सीएनक्सशी बोलताना सांगितले. पूजा म्हणाली, ‘‘ट्रेनमधल्या गाण्यांचे शूटिंग करण्यासाठी मोस्टली, लोक मॉरिशसला जातात. पण चीटर या चित्रपटाचे ८० टक्के शूटिंग मॉरिशसमध्ये झाले आहे. कथेनुसार, एका मॉरिशसच्या प्राचीन हवेलीमध्ये चित्रपटाचे काही चित्रीकरण करण्यात आले. तसेच या देशात ७० टक्के लोक भारतीय असल्यामुळे मॉरिशसमध्ये राहूनदेखील आमच्या पूर्ण टीमने महाशिवरात्री अगदी उत्साहात साजरी केली. हा देश छोटा, पण संपूर्ण जग पाहिले असे वाटते. काम जितके केले तितकाच आनंद, मजामस्तीदेखील मॉरिशसमध्ये केली. जवळजवळ २० ते २२ दिवस टीमसोबत होतो. दिग्दर्शक अजय फणसे यांचा हा चित्रपट असून यामध्ये वैभव तत्त्ववादी, पूजा सावंत, आसावरी जोशी, हृषीकेश जोशी अशा तगड्या कलाकारांचा समावेश आहे.

Web Title: 'Cheater' shooting in Mauritius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.