सेलिब्रिटींचा ‘आयकॉनिक’ रोलला नकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2017 03:59 IST2017-05-20T03:59:25+5:302017-05-20T03:59:25+5:30
कुठला चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अन् कुठला दणकन आपटेल, याचा काही भरवसा नाही. अनेकदा याचा अंदाज बांधणे अशक्य असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत

सेलिब्रिटींचा ‘आयकॉनिक’ रोलला नकार!
- CNX Team
कुठला चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अन् कुठला दणकन आपटेल, याचा काही भरवसा नाही. अनेकदा याचा अंदाज बांधणे अशक्य असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचे अंदाज असेच चुकलेत. काही सेलिब्रिटींनी जे चित्रपट नाकारले, तेच चित्रपट पुढे सुपरडुपर हिट झालेत. आपण हा चित्रपट नाकारायला नको होता... कोण जाणे, असे दु:ख या सेलिब्रिटींना वाटून गेले असावे. आयकॉनिक रोल नाकारलेल्या अशाच काही सेलिब्रिटींविषयी....
कंगना राणौत (डर्टी पिक्चर)
‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटाने विद्या बालनला भूतो ना भविष्यति असे यश मिळवून दिले. पण ही भूमिका सर्वप्रथम कंगना राणौतला आॅफर झाली होती. पण कंगनाने का कोण जाणे, ही भूमिका नाकारली आणि कदाचित ही तिच्या करिअरमधील सगळ्यांत महाग चूक ठरली.
करिना कपूर (कल हो ना हो)
‘कल हो ना हो’ या चित्रपटातील नैनाची भूमिका सर्वप्रथम करिना कपूरला आॅफर झाली होती. पण ही भूमिका करिनाने नाकारली. पुढे ही भूमिका प्रीती झिंटाच्या वाट्याला आली आणि ‘नैना’ हिट ठरली. अर्थात हा चित्रपट सुपरडुपर हिट राहिला.
अजय देवगण (करण अर्जुन)
करण अर्जुनमध्ये शाहरूख खानची भूमिका अजय देवगणला आॅफर केली गेली होती. पण अजयने यास नकार दिला अन् सगळा भाव एसआरके खावून गेला.
ऐश्वर्या राय (राजा हिंदुस्तानी)
आमिर खान व करिश्मा कपूर स्टारर ‘राजा हिंदुस्तानी’ हा सिनेमा प्रचंड हिट झाला होता. या चित्रपटात करिश्माने साकारलेली भूमिका सर्वप्रथम ऐश्वर्याला आॅफर केली गेली होती.
शाहरुख खान (लगान)
आमिर खानशिवाय ‘लगान’ची आज तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण खरे तर यातील लीड रोलसाठी सर्वप्रथम शाहरुखचे नाव समोर आले होते. शाहरुखने हा चित्रपट नाकारला म्हणून यात आमिर दिसला.
हृतिक रोशन (दिल चाहता है)
‘दिल चाहता है’ या तरुणाईला प्रचंड भावलेल्या चित्रपटातील आकाशची भूमिका सर्वप्रथम हृतिकला आॅफर केली गेली होती. पण हृतिकने यास नकार दिला आणि आमिर खान आकाश बनला.
सलमान खान (बाजीगर)
होय, सलमान खान ‘बाजीगर’ बनता बनता राहिला. ही भूमिका सलमानने नाकारली आणि मग शाहरुखने हा चित्रपट करून लोकप्रियतेचा एक इतिहास रचला.
अक्षयकुमार (भाग मिल्खा भाग)
‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमासाठी खिलाडी अक्षयकुमार मेकर्सची पहिली चॉईस होता. पण अक्षयने या भूमिकेसाठी नकार दिला आणि या चित्रपटात फरहानची वर्णी लागली.
कॅटरिना कैफ (ये जवानी है दिवानी)
‘ये जवानी है दिवानी’ या सुपरहिट सिनेमात खरे तर कॅटरिना कैफ दिसली असती. पण कॅटने नकार दिला. त्या नकाराचे परिणाम नंतर तिने बघितलेच.