‘अलोन’च्या रिलीजपूर्वीच सेलिब्रेशन
By Admin | Updated: December 23, 2014 23:26 IST2014-12-23T23:26:33+5:302014-12-23T23:26:33+5:30
बिपाशा बासूचा ‘अलोन’ हा चित्रपट येत्या १६ जानेवारीला रिलीज होत आहे; पण या चित्रपटाच्या रिलीजच्या २५ दिवसांपूर्वीच या चित्रपटासाठी मुंबईत पार्टी देण्यात आली.

‘अलोन’च्या रिलीजपूर्वीच सेलिब्रेशन
बिपाशा बासूचा ‘अलोन’ हा चित्रपट येत्या १६ जानेवारीला रिलीज होत आहे; पण या चित्रपटाच्या रिलीजच्या २५ दिवसांपूर्वीच या चित्रपटासाठी मुंबईत पार्टी देण्यात आली. ही पार्टी ‘अलोन’च्या यशासाठी नव्हती, तर त्याच्या प्रोमोसाठी होती. ‘अलोन’चा प्रोमोला इंटरनेटवर तब्बल ५० लाख हिटस् मिळाल्याचे सांगितले जाते, याचाच अर्थ हा प्रोमो इंटरनेटवर ५० लाख वेळा पाहिला गेला आहे. हे एक नवे रेकॉर्ड आहे. यापूर्वी कोणत्याही ‘हॉरर’ चित्रपटाचा प्रोमो किंवा गाण्यांना एवढ्या हिटस् मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे ‘अलोन’च्या पूर्ण टीमने मुंबईत सेलिब्रेशन केले. या पार्टीला बिपाशा बासूसह चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती. चित्रपटात करण सिंह ग्रोवर बिपाशाचा हीरो आहे. भूषण पटेलने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बिपाशा या चित्रपटात दुहेरी भूमिकेत आहे.