परिणीतीसोबत कॅटची दोस्ती

By Admin | Published: January 25, 2017 02:46 AM2017-01-25T02:46:28+5:302017-01-25T02:46:28+5:30

‘एक था टायगर’मध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही रोमँटिक जोडी आपल्याला पहावयास मिळाली होती.

Cat's friendship with the result | परिणीतीसोबत कॅटची दोस्ती

परिणीतीसोबत कॅटची दोस्ती

googlenewsNext

‘एक था टायगर’मध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही रोमँटिक जोडी आपल्याला पहावयास मिळाली होती. आता पुन्हा एकदा कॅट आणि सल्लूमियाँ हे ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. पण, सध्या ती एका व्यक्तीच्या मैत्रीमध्ये चांगलीच रमली आहे. कोण आहे ही व्यक्ती? बॉलिवूडची बबली गर्ल परिणीती चोप्रा हिच्यासोबत तिची गट्टी जमल्याचे दिसतेय. मागील वर्षी जेव्हा ते ‘ड्रीम टीम टूर २०१६’ साठी यूएसला गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर आणि करण जोहर हे देखील होते. कॅटरिना नेहमीच आत्तापर्यंतची आलियाची जवळची मैत्रीण राहिलेली आहे. मात्र, परिणीतीसोबतही तिची आता चांगली ट्यूनिंग जमली आहे. त्यांच्या यारीदोस्तीला कुणाचीही नजर लागू नये एवढीच आमची इच्छा आहे.ी ‘दोस्ती’!

Web Title: Cat's friendship with the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.