पुन्हा डॅशिंग रोलमध्ये कॅट!
By Admin | Updated: June 16, 2014 11:33 IST2014-06-16T11:33:45+5:302014-06-16T11:33:45+5:30
‘एक था टायगर’ आणि ‘धूम- 3’सारख्या चित्रपटांमध्ये अॅक्शन भूमिका साकारणारी कॅटरिना कैफ पुन्हा एकदा डॅशिंग रोलमध्ये दिसणार आहे.

पुन्हा डॅशिंग रोलमध्ये कॅट!
>‘एक था टायगर’ आणि ‘धूम- 3’सारख्या चित्रपटांमध्ये अॅक्शन भूमिका साकारणारी कॅटरिना कैफ पुन्हा एकदा डॅशिंग रोलमध्ये दिसणार आहे. ‘जग्गा जासूस’ या आपल्या आगामी चित्रपटात तिला अॅक्शन रोल करण्याची संधी मिळाली आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या घनदाट जंगलात तिचे अॅक्शन सीन शूट करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे चित्रपटातील संपूर्ण अॅक्शन सीन ती स्वत: करणार आहे. या अॅक्शन सीनसाठी
कॅटने इस्नयलमध्ये मार्शल आर्टची अशी एक खास ट्रेनिंग घेतली आहे, जी इस्नयल सैनिकांना दिली जाते. अनुराग बासू बनवीत असलेल्या या चित्रपटात कॅटचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरही आहे.