नात्यांचे ओझे करिअरवर भारी!
By Admin | Updated: October 26, 2015 03:00 IST2015-10-26T00:32:50+5:302015-10-26T03:00:04+5:30
कुणाल खेमू सध्या ‘गुड्डू की गन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. परंतु या दरम्यान जेव्हा त्याच्यासमोर सैफ अली खानचा उल्लेख होतो तेव्हा ती गोष्ट त्याला खूप बोचते.

नात्यांचे ओझे करिअरवर भारी!
कुणाल खेमू सध्या ‘गुड्डू की गन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. परंतु या दरम्यान जेव्हा त्याच्यासमोर सैफ अली खानचा उल्लेख होतो तेव्हा ती गोष्ट त्याला खूप बोचते. नात्याने कुणाल छोट्या नवाबचा जवाई आहे यामुळेच सैफशी त्याची तुलना केली जाते. मात्र कुणाल असे काहीच मानत नाही. त्याच्या मते नातेसबंध आपल्या जागी आहेत तर करिअर आपल्या जागी. परंतु नात्यांचे ओझे करिअरवर भारी पडतेय हे मात्र खरे आहे.
कुणाल म्हणतो मी करिअरच्या बाबतीत सोहाचा देखील सल्ला घेत नाही. आणखी एक कुणाल अशाच परिस्थितीतून जात आहे. बच्चन कुटुबीयांचा जावई असलेल्या कुणाल कपूरचा विवाह अजिताभ बच्चन यांची मुलगी व अमिताभची पुतणी नैनासोबत झाला आहे. कु णाल कपूरच्या करिअरला बच्चन परिवार मदत क रेल अशी आशा होती. मात्र कुणालचा तर्कही कुणाल खेमूसारखाच आहे. कॅमेऱ्यासमोर नातलगांची मदत होत नाही. स्वत:ची इमेज तयार करण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या कामाचे मूल्यमापन दर्शक करतात. माझे स्वप्न अंकल (अमिताभ बच्चन) सोबत काम करण्याचे आहे. दर्शक दोन कलाकारांना एकत्र पाहतील, असे तो सांगत असतो.
आता तिसऱ्या कुणालची गोष्ट करूयात. हा कुणाल म्हणजे, कुणाल रॉय कपूर. यूटीव्हीचे प्रमुख सिद्धार्थ राय कपूरचा भाऊ व विद्या बालनचा दिर असलेल्या कुणालसाठी भाऊ व वहिणीची स्वतंत्र ओळख आहेच. त्यांची मदत घेण्याच्या विषयाला तो मोडून काढतो. त्याच्या मते नावावर कुणीच काम देत नाही, काम स्वत:च्या बळावर मिळते. माझ्यावर अशी वेळ कधीच येणार नाही जेव्हा मी कामासाठी कुणाची (सिद्धार्थ व विद्या) मदत घेईल. मी सेल्फमेड आहे याचा मला गर्व आहे असे तो अभिमानाने सांगतो.
बऱ्याच काळानंतर फैसल खानचा सिनेमा चीनार रिलीझ झाला. मात्र आमीर खानचा भाऊ म्हणून मिळालेली ओळख त्याला आवडली नाही. संतापलेल्या स्वरात तो म्हणतो, त्याची पोझिशन आपल्या जागी माझी आपल्या जागी.मला त्याच्याशी (अमीर खान) सल्ला घेण्याची गरजच काय? मी स्वत:चे निर्णय घेऊ शकतो. दुसरीकडे फैसल अमीरच्या प्रोडक्शन कंपनीत स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करतो व कथेविषयी सल्ला देणे माझे कामच आहे अशीही पुश्ती जोडतो. बॉलिवूडमध्ये नातेसंबधांत अनेकदा गुंतागुंत निर्माण झाली आहे.
- anuj.alankar@lokmat.com