जान्हवीच्या ‘लॉन्च’साठी बोनी कपूर सज्ज!!

By Admin | Updated: November 10, 2016 03:19 IST2016-11-10T03:19:31+5:302016-11-10T03:19:31+5:30

एका स्टार किड्सच्या बॉलिवूड डेब्यूकडे सध्या सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. हे नाव म्हणजे, श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर. बऱ्याच दिवसांपासून जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल चर्चा ऐकायला येतेय.

Boney Kapoor is ready for Jhanvi's 'Launch' !! | जान्हवीच्या ‘लॉन्च’साठी बोनी कपूर सज्ज!!

जान्हवीच्या ‘लॉन्च’साठी बोनी कपूर सज्ज!!

एका स्टार किड्सच्या बॉलिवूड डेब्यूकडे सध्या सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. हे नाव म्हणजे, श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर. बऱ्याच दिवसांपासून जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल चर्चा ऐकायला येतेय. या चर्चांमध्ये किती तथ्य, हे आम्हाला माहिती नाही. पण,जान्हवीने बॉलिवूड डेब्यूची जोरदार तयारी सुरु आहे. यादिशेने जान्हवीने एक पाऊलही पुढे टाकले आहे. पुढील वर्षी जान्हवी बॉलिवूड डेब्यू करणार आहे. आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी जान्हवीने गुपचूप तयारीही सुरु केली आहे. जान्हवीचे डॅडी अर्थात बोनी कपूर यांनी तिचे काम बघण्यासाठी आधीच काही माणसं अपॉईन्ट केली आहेत. अभिनयाच्या प्रशिक्षणासह तिने भरतनाट्यम्चे धडेही गिरवले आहेत. एकंदर काय, तर जान्हवी तिचा पहिला-वहिला बॉलिवूड प्रोजेक्ट साईन करण्यासाठी एकदम सज्ज आहे. होय, चर्चा खरी मानली तर, बोनी कपूर आपल्या मुलीला लॉन्च करणार अशी चर्चा आहे. या चित्रपटात जान्हवीच्या अपोझिट मल्याळम अभिनेता दलकेर सलमान दिसणार असल्याचेही ऐकिवात आहे.

Web Title: Boney Kapoor is ready for Jhanvi's 'Launch' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.