या अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंगचे प्रेमप्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 17:13 IST2016-12-12T15:19:37+5:302016-12-12T17:13:54+5:30

क्रिकेटर युवराज सिंगने नुकतेच अभिनेत्री हॅजल कीचसोबत लग्न केले. या सिक्सर किंगचा 12 डिसेंबरला वाढदिवस असतो. युवराजच्या वाढदिवसानिमित्त जाणून ...

Yuvraj Singh's love affair with these actresses | या अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंगचे प्रेमप्रकरण

या अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंगचे प्रेमप्रकरण

रिकेटर युवराज सिंगने नुकतेच अभिनेत्री हॅजल कीचसोबत लग्न केले. या सिक्सर किंगचा 12 डिसेंबरला वाढदिवस असतो. युवराजच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तुम्हाला माहीत नसलेल्या त्याच्याबद्दलच्या या काही गोष्टी...
 
युवराजचे वडील योगराज सिंग हेदेखील प्रसिद्ध क्रिकेटर आहेत. युवराज आज प्रसिद्ध क्रिकेटर असला तरी त्याच्या लहानपणी त्याला क्रिकेट खेळायला आवडायचे नाही. तोे रोलर स्केटिंग आणि टेनिसचा चाहता होता. पण वडिलांच्या सततच्या ओरड्यामुळे तो क्रिकेटकडे वळला.

yuvraj singh childhood pictures  
 
युवराजने अभिनेत्रीसोबत लग्न केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का युवराजने क्रिकेटर बनण्याआधी अभिनयात भाग्य आजमावले होते. मेहेंदी सगना दी आणि पुत्र सरदार या दोन पंजाबी चित्रपटात तो बालकलाकाराच्या भूमिकेत झळकला होता.

cricketer yuvraj singh
 
युवराजचे नाव क्रिकेटच्या मैदानावर जितके गाजले, तितकेच त्याचे नाव मैदानाच्या बाहेरही गाजले. क्लबमध्ये पार्टी करणे, मजामस्ती करणे ही गोष्ट युवराजला खूपच आवडते.

yuvraj singh in masti mood
 
युवराजचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले होते. मोहोब्बते या चित्रपटातील किम शर्मासोबत युवराजचे अनेक वर्षं अफेअर होते. तसेच प्रिती झिंटा, दीपिका पादुकोण, रिया सेन, मिनिषा लांबा या अभिनेत्रींसोबतही त्याचे प्रेमसंबंध असल्याचे म्हटले जाते. 

yuvraj singh and deepika padukone
 
युवराजला काही वर्षांपूर्वी कर्करोग झाला होता. पण आजारपणावर मात करून तो क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परतला.

yuvraj singh 
 
युवराजच्या आयुष्यावर द टेस्ट ऑफ माय लाइफ हे पुस्तकही लिहिण्यात आले आहे. 

autobiography of yuvraj singh
 
युवराज क्रिकेटर सचिन तेंडुलकरला त्याचा मेन्टर मानतो. अनेकवेळा क्रिकेटच्या मैदानावर युवराजने सचिनच्या पाया पडलेल्यादेखील आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत.

sachin tendulkar and yuvraj singh 
 
* युवराजला नवज्योत सिंग सिद्धू यांनी क्रिकेटचे प्रशिक्षण द्यावे असे योगराज सिंग यांचे म्हणणे होते. सिद्धू यांनी युवराजला शिकवण्याचा प्रयत्नदेखील केला. पण तो चांगला क्रिकेटर होऊ शकत नाही असेच त्यांना तेव्हा वाटले होते. 

Yuvraj singh
 
* युवराजने एका ओव्हरमध्ये सहा सिक्सर मारल्या होत्या. 

Yuvraj singh
 

Web Title: Yuvraj Singh's love affair with these actresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.