​युलियासाठी सलमानचा जीव झुरतोय तोळा तोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 21:25 IST2016-09-10T15:55:47+5:302016-09-10T21:25:47+5:30

बॉलीवूडमध्ये या वर्षी सर्वात बहुप्रतिक्षीत जर कोणती गोष्ट असेल तरी ती म्हणजे सलमान खानचे लग्न. येत्या १८ नोव्हेंबर रोजी ...

For Yulia, Salman's life is worthwhile | ​युलियासाठी सलमानचा जीव झुरतोय तोळा तोळा

​युलियासाठी सलमानचा जीव झुरतोय तोळा तोळा

लीवूडमध्ये या वर्षी सर्वात बहुप्रतिक्षीत जर कोणती गोष्ट असेल तरी ती म्हणजे सलमान खानचे लग्न. येत्या १८ नोव्हेंबर रोजी सलमान आपली प्रेयसी युलियाशी लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

तत्पूर्वी युलियाला भारतात राहण्याची कायम परवानगी मिळवून देण्यासाठी सलमान आपल्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत आहे. नोव्हेंबर महिन्यात तिचा व्हिसा एक्सपायर होणार असल्यामुळे युलिया त्याचे नुतनीकरण करण्यासाठी परत रोमानियाला गेली आहे.

सलमान सध्या मनालीमध्ये कबीर खानच्या ‘ट्युबलाईट’ सिनेमाची शूटींग करत असून जवळच्या सुत्रांनुसार लग्नाची तयारी सुरूदेखील झाली आहे. एका घरगुती समारंभात ते दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळतेय.

त्याआधीच युलियाला कायम वास्तव्याची परवानगी मिळावी याकरिता सलमान विदेश मंत्रालयात स्वत:चे वजन वापर आहे. प्रेमासाठी तर तो एवढे करूच शकतो ना.

Web Title: For Yulia, Salman's life is worthwhile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.