बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आयुष्यातील ‘हे’ सत्य जाणून तुम्हाला धक्का बसेल...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:52 IST2018-03-22T10:20:16+5:302018-03-22T15:52:56+5:30
अनंत अडचणींचा सामना करून हीरो त्यातून मार्ग काढत असल्याचे आपण पडद्यावर नेहमीच बघत असतो. परंतु काही कलाकार असेही आहेत, ...

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आयुष्यातील ‘हे’ सत्य जाणून तुम्हाला धक्का बसेल...!
राणी मुखर्जी
गेल्या २१ मार्च रोजी अभिनेत्री राणी मुखर्जीने तिचा ४० वा वाढदिवस साजरा केला. २३ मार्च रोजी तिचा ‘हिचकी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटात राणी टुरेट सिंड्रोमग्रस्त असलेल्या महिलेची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती काही कारणांमुळे सातत्याने हकलत बोलत असतो. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान राणीने तिच्या आयुष्याशी निगडित एका रहस्याचा उलगडा केला आहे. तिने सांगितले की, मला हकलत बोलण्याचा त्रास होता, मात्र अभिनयासाठी मी त्याच्यावर नियंत्रण मिळविले. तब्बल २२ वर्ष मी हा त्रास सहन केला. याविषयी सुरुवातीला कोणालाही माहिती नव्हते. परंतु मी माझा हा त्रास माझ्या आयुष्याची कमजोरी बनू दिली नाही, असेही राणीने सांगितले.
हृतिक रोशन
ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन तरुण पिढीचा आदर्श आहे. केवळ त्याचा लुक्स आणि फिजिकच नव्हे तर त्याचे आयुष्यही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. कारण अनेक शारीरिक अडचणींवर मात करून त्याने स्वत:चे वलय निर्माण केले आहे. वयाच्या सहा वर्षापर्यंत हृतिकला हकलत बोलण्याची सवय होती. यासाठी त्याला अनेक कष्टदायी स्पीच थेरपीचा सामना करावा लागला. मेहनत आणि समर्पित वृत्तीच्या जोरावर हृतिकने या सवयीवर मात केली. आज हृतिकला बॉलिवूडमधील सुपरस्टार्स कॅटेगिरीमध्ये ओळखले जाते.
अभिषेक बच्चन
बºयाच कमी लोकांना ही बाब माहिती असेल की, अभिषेक बच्चनला लहानपणी डिस्लेक्सिया हा आजार होता. या आजाराबद्दल लोकांना तेव्हा माहिती झाले जेव्हा ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणारा दर्शील सफारी डिस्लेक्सिया या आजाराने ग्रस्त दाखविला. असाच आजार अभिषेकलाही होता. परंतु त्याने या आजारावर मात करीत स्वत:ला सिद्ध केले.
राणा दग्गूबत्ती
‘बाहुबली-२ : द कंक्लूजन’च्या प्रमोशनदरम्यान राणा दग्गूबत्तीने स्वत:विषयी एक खळबळजनक खुलासा केला होता. होय, राणाने सांगितले होते की, त्याला एका डोळ्याने दिसत नाही. लहानपणी एका आजारपणामुळे त्याच्या एका डोळ्याची दृष्टी गेली होती. मात्र ही कमतरता त्याने त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू दिली नाही. मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध करीत मनोरंजन क्षेत्रात स्थान मिळविले.
इलियाना डिक्रूज
अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिच्या गुड लुक्स आणि फिगरवर तरुणाई फिदा आहे. इलियानाने एका मुलाखतीत मान्य केले होते की, ती बॉडी डिसमॉर्फिक डिसआॅडर (बीडीडी), तणाव आणि दडपणाला बळी पडली होती. हे खूपच कष्टदायी होती. या मानसिक आजाराने ग्रस्त असलेले लोक दिवसातील कित्येक तास हाच विचार करीत असतात की, त्यांच्या शरीरात कुठली तरी कमतरता आहे. इतरांनी जर याविषयी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी, हे लोक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. भावनात्मकरीत्या हे लोक एवढे नकारात्मक असतात की, त्यांना एकांतात राहणे पसंत असते. अशाच प्रसंगातून इलियानाला जावे लागले.
दीपिका पादुकोण
बॉलिवूडमध्ये दीपिका पादुकोण सध्या सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. परंतु एक काळ असा होता की, दीपिकाला डिप्रेशनचा सामना करावा लागला. वास्तविक सेलिब्रिटी अशाप्रकारच्या गोष्टींची जाहीरपणे वाच्यता करीत नाहीत, मात्र दीपिकाने याविषयी बिनधास्तपणे सांगितले आहे. तिने म्हटले होते की, मला असे वाटले की, मी तणावात आहे. त्यामुळे मी माझ्या कामावर फोकस करण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाग्रता भंग झाली होती. यातून स्वत:ला सावरणे अवघड होते. मात्र मी त्यावर मात केली.