...होय, ईशा देओल आहे प्रेग्नंट, आई हेमा मालिनेने केले ट्विट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 18:49 IST2017-04-26T13:16:38+5:302017-04-26T18:49:20+5:30

काही दिवसांपूर्वीच सोहा अली खान प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली होती. आता आणखी एक गोड बातमी समोर येत असून, ...

Yes, Isha Deol is Pregnant, Hema Malini made a tweet !! | ...होय, ईशा देओल आहे प्रेग्नंट, आई हेमा मालिनेने केले ट्विट!!

...होय, ईशा देओल आहे प्रेग्नंट, आई हेमा मालिनेने केले ट्विट!!

ही दिवसांपूर्वीच सोहा अली खान प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली होती. आता आणखी एक गोड बातमी समोर येत असून, ती देओल परिवारातील आहे. होय, लग्नाच्या पाच वर्षांनंतर ईशा देओल प्रेग्नेंट असून, ही गोड बातमी तिची मम्मी हेमा मालिनी यांनीच ट्विटवर शेअर केली आहे. 

लवकरच आजी होणार या आनंदाने सध्या हेमा मालिनी खूश असून, त्या मुलीची प्रचंड काळजी घेत आहेत. ईशा, हेमा आणि अभिनेता धर्मंेद्र यांची मुलगी आहे. पाच वर्षांपूर्वी तिने भरत तख्तानी याच्याशी विवाह केला होता. हेमाने या आनंदाच्या बातमीचे ट्विट करताना लिहिले की, ‘देओल आणि तख्तानी परिवार ही घोषणा करताना आनंदी आहे की, देओ आणि भरत तख्तानी परिवार पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी उत्सुक आहे.’



ईशाच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त हेमा मालिनीने म्हटले होते की, अपेक्षा करते की, ईशाने आपला परिवार वाढवायला हवा.’ त्यांनी पीटीआयला सांंगितले होते की, ‘माझी ईशाकडून एकच अपेक्षा आहे की, तिने लवकरात लवकर तिचा परिवार वाढवायला हवा. एक आई म्हणून माझी हिच इच्छा आहे. आता हेमा यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याने त्या खूश असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. 

ईशाने २९ जून २०१२ रोजी व्यावसायिक भरत तख्तानी याच्याशी विवाह केला होता. ३५ वर्षीय ईशाने ‘एलओसी कारगिल, युवा, धुम, आॅँखे आणि कॅश’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. लग्नानंतर ईशाने इंडस्ट्रीत राहण्यास फारसा उत्साह दाखविला नाही. ती २०१५ मध्ये कन्नड चित्रपट ‘केअर आॅफ फुटपाथ’मध्ये बघावयास मिळाली होती. असो, आता देओल-तख्तानी परिवार नव्या पाहुण्याच्या प्रतीक्षेत असून, त्यांच्या परिवारात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. 

Web Title: Yes, Isha Deol is Pregnant, Hema Malini made a tweet !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.