​होय, रणबीर कपूरच्या आयुष्यात आली आणखी एक मिस्ट्री गर्ल! जाणून घ्या, तिच्याबद्दल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 11:36 IST2017-09-05T06:06:35+5:302017-09-05T11:36:35+5:30

होय, ऐकता ते खरे आहे, रणबीर कपूरच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या मिस्ट्री गर्लची एन्ट्री झाल्याची खबर आहे. तसेही रणबीर ...

Yes, another mystery girl came in Ranbir Kapoor's life! Learn about it !! | ​होय, रणबीर कपूरच्या आयुष्यात आली आणखी एक मिस्ट्री गर्ल! जाणून घ्या, तिच्याबद्दल!!

​होय, रणबीर कपूरच्या आयुष्यात आली आणखी एक मिस्ट्री गर्ल! जाणून घ्या, तिच्याबद्दल!!

य, ऐकता ते खरे आहे, रणबीर कपूरच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या मिस्ट्री गर्लची एन्ट्री झाल्याची खबर आहे. तसेही रणबीर कपूर प्रोफेशनल लाईफपेक्षा त्याच्या लव्ह लाईफमुळेच चर्चेत असतो. आताही तो अशाच कारणाने चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरच्या आयुष्यातील दिल्ली येथे राहणा-या मिस्ट्री गर्लची चर्चा झाली होती. दिल्लीच्या या मिस्ट्री गर्लचे नाव होते भारती. पण आता कदाचित भारती जुनी झालीयं. होय, कारण रणबीरच्या आयुष्यात नवी मिस्ट्री गर्ल आली आहे. ही मिस्ट्री गर्ल दिल्लीची नसून मुंबईची आहे. दक्षिण मुंबईच्या एका मुलीला रणबीर डेट करत असल्याची खबर आहे. केवळ इतकेच नाही तर दोघेही वांद्र्यातील आर्ट्स क्लबमध्ये गुपचूप भेटतात, असेही कळतेय. लोकांच्या विशेषत: मीडियाच्या नजरेपासून दूर राहण्याचा या दोघांचाही खटाटोप दिसतोय. खरे तर रणबीर सध्या संजय दत्तचे बायोपिक आणि अयान मुखर्जीच्या एका चित्रपटात बिझी आहे. पण इतका बिझी असूनही तो या मिस्ट्री गर्लसाठी वेळ काढतोय म्हटल्यावर नक्कीच मॅटर सीरिअस आहे. आता हे नाते किती दिवस टिकते आणि टिकलेच तर कधी सर्वांसमोर येते, याचीच प्रतीक्षा असेल.

ALSO READ : होय, ‘फ्लर्ट’च्या बाबतीत रणबीर कपूर एकदम बेकार!!

काही दिवसांपूर्वी रणबीर आईच्या आवडीच्या मुलीसोबत लग्न करणार, अशी बातमी होती. या मुलीला पाहण्यासाठी रणबीर आई नीतू सिंह हिच्यासोबत लॉस एंजिल्सला गेला होता, इथपर्यंत सांगितले गेले होते. पण कदाचित रणबीरच्या मनात काही वेगळेच आहे. कॅटरिनाशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर आपल्या आयुष्यात बराच पुढे निघून गेला आहे. आता येणाºया दिवसांत रणबीर काय निर्णय घेतो आणि आयुष्यात कुणाला पार्टनर म्हणून निवडतो, ते बघूच.

Web Title: Yes, another mystery girl came in Ranbir Kapoor's life! Learn about it !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.