अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा ख्रिसमस प्लॅन बोंबलला, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 15:36 IST2020-12-25T15:21:08+5:302020-12-25T15:36:41+5:30
जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा ख्रिसमस प्लॅन बोंबलला, जाणून घ्या कारण...
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ख्रिसमसमध्ये खूप व्यस्त असणार आहे. सध्या जॅकलिन तिच्या आगामी सिनेमा ‘भूत पोलिस’ आणि ‘सर्कस’ सिनेमाचे बॅक टू बॅक शूटिंग करते आहे. जॅकलिनने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिने ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी तिने आई-वडिलांना मुंबईत बोलवलं होतं, परंतु कोरोनामुळे सगळी गणित बिघडली.
गेल्या वर्षीच्या ख्रिसमसच्या आठवणी उजाळा देताना जॅकलिन म्हणाली की आम्ही फ्रान्समध्ये शेवटचा ख्रिसमस साजरा केला होता आणि त्या आधी आम्ही बालीला गेलो होतो. यावर्षी माझे आई-बाब मुंबईत येत होते, म्हणून मी खूप उत्सुक होते आणि त्यांच्यासाठी एक खास डिश बनवणार होतो. परंतु या महामारीमुळे अचानक पुढची सूचना होईपर्यंत सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आणि माझ्या सगळ्या स्वप्नावर पाणी फेरलं.
जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत.
जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २००८ साली तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. शेवटची ती नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या मिसेस सीरियल किलरमध्ये दिसली होती.