ऍड वर्ल्डमध्ये यामीची चलती !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 13:26 IST2016-07-21T07:51:15+5:302016-07-21T13:26:57+5:30
'विकी डोनर' या सिनेमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री यामी गौतम सध्या भलतीच फॉर्मात आहे. बडे स्टार आणि बड्या कलाकारांसह अभिनयाची ...

ऍड वर्ल्डमध्ये यामीची चलती !
' ;विकी डोनर' या सिनेमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री यामी गौतम सध्या भलतीच फॉर्मात आहे. बडे स्टार आणि बड्या कलाकारांसह अभिनयाची संधी तिला मिळतेय. सध्या हृतिक रोशनच्या आगामी काबिल या सिनेमाच्या शूटिंगमध्ये ती बिझी आहे. मोठ्या पडद्यावर नाव कमावणारी यामी छोट्या पडद्यावरील जाहिरातींमधला एक प्रसिद्ध चेहरा आहे.सिनेमांच्या ऑफर्सप्रमाणे तिच्या विविध जाहिरातींच्या ऑफर्स आहेत.त्यामुळंच की आपल्या बिझी सिनेमाच्या शेड्युलमधून वेळ काढत यामी ऍड शूटलाही तितकाच वेळ देतेय. जुलै महिन्यांच्या सुरुवातीपासून तीन ते चार बड्या कंपन्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातींसाठी यामी तीन वेगवेगळ्या शहरात फिरलीय.त्यामुळं ऍड वर्ल्डला यामीच्या सौंदर्यानं भलतीच मोहिनी घातलीय असं म्हटल्यास वावगं ठरु नये.
![]()
![]()
![]()