उद्या सकाळी होणार अत्यंसंस्कार; रात्री उशिरा मुंबईत आणले जाईल श्रीदेवींचे पार्थिव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 20:06 IST2018-02-25T14:36:29+5:302018-02-25T20:06:29+5:30

‘अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन’ या बातमीने बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत, सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यानाच धक्का दिला आहे. पुतण्याच्या लग्नसमारंभात श्रीदेवी ...

Will be celebrated tomorrow morning; Sridevi's family will be brought to Mumbai late in the night! | उद्या सकाळी होणार अत्यंसंस्कार; रात्री उशिरा मुंबईत आणले जाईल श्रीदेवींचे पार्थिव!

उद्या सकाळी होणार अत्यंसंस्कार; रात्री उशिरा मुंबईत आणले जाईल श्रीदेवींचे पार्थिव!

भिनेत्री श्रीदेवी यांचे निधन’ या बातमीने बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत, सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यानाच धक्का दिला आहे. पुतण्याच्या लग्नसमारंभात श्रीदेवी मुलगी आणि पतीसोबत दुबईला पोहोचल्या होत्या. लग्न सोहळ्यातील सेलिब्रेशनचे काही फोटोज् देखील त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. शिवाय त्यांचा एक व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या पती बोनी कपूरसोबत डान्स करताना बघावयास मिळत आहेत. एकुणच काही तासांपर्यंत अतिशय सामान्य आणि आनंदी जीवन जगणाºया श्रीदेवी यांनी अचानकच एक्झिट घेतल्याने अनेकांना यावर विश्वास ठेवणे अवघड होत आहे. आज श्रीदेवी आपल्यात नाहीत यावर अजुनही अनेकांचा विश्वास बसत नाही. 

दरम्यान, श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच इंडस्ट्रीतील अनेक बड्या सेलिब्रिटींसह त्यांच्या चाहत्यांना घराबाहेर एकच गर्दी केली. सध्या त्यांच्या घरासमोर चाहत्यांची मोठी गर्दी बघावयास मिळत आहे. प्रत्येकजण श्रीदेवी यांच्या पार्थिवाची प्रतिक्षा करीत आहे. जेणेकरून त्यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येईल. 

उपलब्ध माहितीनुसार, श्रीदेवी यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी अत्यंसंस्कार केले जाणार आहेत. रात्री उशिरापर्यंत ११ वाजेच्या सुमारास त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल. सुरुवातीला आजच  त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले जाणार असल्याची चर्चा होती. परंतु दुबईमध्ये पेपर वर्क करण्यात बराचसा वेळ गेल्याने त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यास उशीर होणार आहे. त्यामुळेच त्यांच्यावर अत्यंसंस्कार उद्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

अत्यसंस्काराची सर्व तयारी झाली असून, त्यांचे पार्थिव आज रात्रीपर्यंत अत्यंदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवले जाणार आहे. दरम्यान, श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवी तिच्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे लग्नात सहभागी होवू शकली नव्हती. त्यामुळे ती मुंबईतच काका अनिल कपूरकडे आहे. करण जोहर तिचे सात्वंन करीत असून, रात्री उशिरा जान्हवी तिच्या राहत्या घरी आणले जाईल. 

Web Title: Will be celebrated tomorrow morning; Sridevi's family will be brought to Mumbai late in the night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.