जाणून घ्या का नाकार दिला करण जोहरने वरुण धवनला 'बाहुबली3'साठी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2017 16:30 IST2017-07-17T10:54:09+5:302017-07-17T16:30:03+5:30

18व्या आयफा अॅवॉर्ड सोहळा न्यूयॉर्कमध्ये मोठ्या धुमधड्याक्यात पार पडला. यावेळी वरुण धवनला ढिशूम चित्रपटासाठी बेस्ट एक्टर इन कॅमिओ अॅवॉर्ड ...

Why did you reject Varun Dhawan for 'Bahubali3'? | जाणून घ्या का नाकार दिला करण जोहरने वरुण धवनला 'बाहुबली3'साठी ?

जाणून घ्या का नाकार दिला करण जोहरने वरुण धवनला 'बाहुबली3'साठी ?

18
्या आयफा अॅवॉर्ड सोहळा न्यूयॉर्कमध्ये मोठ्या धुमधड्याक्यात पार पडला. यावेळी वरुण धवनला ढिशूम चित्रपटासाठी बेस्ट एक्टर इन कॅमिओ अॅवॉर्ड देण्यात आले. हा अॅवॉर्ड स्वीकारताना वरुण इमोशन झाला होता. यावेळी तो म्हणाला हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे कारण माझ्या भावाने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटासाठी मला तो मिळाला आहे.हा अॅवॉर्ड त्यांने आपल्या भावाला समर्पित केला.   
याच दरम्यान वरुण म्हणाला मला माझी बॉलिवूडमधली चॉकलेट बॉयचा इमेज बदलायची आहे. मला काही सीरिअस रोल करायचे आहेत. आयफा होस्ट करणाऱ्या करण जोहरला म्हणाला तू बाहुबलीचा तिसरा पार्ट तयार करणार आहेस त्यात तू मला कास्ट करशील का ? करणने मात्र यासाठी साफ नकार दिला. वरुणने नकार देण्यामागचे कारण विचारले असता करणने कारण सांगण्यास नकार दिला. वरुणची आयफला अॅवॉर्डला हजेरी लावण्याची ही पहिलच वेळ होती. गेल्या पाच वर्षांपासून तो नेहमीच कुठल्या ना कुठल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये किंवा आपल्या कमिटमेंट्समुळे आयफापासून दूर राहिला.        
वरुण धवन 1997 साली आलेल्या जुडवाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. यात वरुणचा डबल रोल असणार आहे. सलमान खानचा यामध्ये कॅमिओ असणार आहे. चित्रपटातील दोन व्हिडीओ इंटरनेट चांगलेच व्हायरल होतायेत. वरुण न्यूयॉर्कमध्ये असताना इकडे त्याच्या घरी त्याच्या साखरपुड्याचा चर्चा आहे. कथित गर्लफ्रेन्ड नताशा दलाल हिच्यासोबत साखरपुडा करून लग्नबंधनात अडकणार असल्याची खबर आहे.   

Web Title: Why did you reject Varun Dhawan for 'Bahubali3'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.