​युवराजच्या लग्नापासून का दूर राहिला धोनी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 13:03 IST2016-12-06T13:03:04+5:302016-12-06T13:03:04+5:30

क्रिकेटपटू युवराज सिंह आणि बॉलिवूड ब्युटी हेजल कीच गत आठवड्यात विवाह बंधनात अडकले. या शाही सोहळ्यांची सोशल मीडियावर बरीच ...

Why did Dhoni stay away from Yuvraj's marriage? | ​युवराजच्या लग्नापासून का दूर राहिला धोनी?

​युवराजच्या लग्नापासून का दूर राहिला धोनी?

रिकेटपटू युवराज सिंह आणि बॉलिवूड ब्युटी हेजल कीच गत आठवड्यात विवाह बंधनात अडकले. या शाही सोहळ्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. आधी पंजाबी पद्धतीने आणि दुसºयांना हिंदू पद्धतीने युवराज व हेजल यांचा लग्नसोहळा पार पडला. क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. विराट कोहली, त्याची गर्लफे्रन्ड अनुष्का शर्मा जहिर खान असे अनेक क्रिकेटपटू या सोहळ्यात पोहोचले. मात्र भारतीय क्रिकेट टीमची ‘शान’ महेन्द्र सिंह धोनी मात्र या सोहळ्यापासून दूर राहिला.

आता धोनी या लग्नाला का आला नाही, हे तर कळायलाच हवे. कारण मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराजने धोनीला चंदीगड आणि गोवा या दोन्ही ठिकाणच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते.असे असताना धोनीच्या या सोहळ्यातील गैरहजेरीमुळे अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या. आता धोनीने असे का केले, यामागचे कारण अगदी ठामपणे सांगता येणार नाही. पण मीडियातील एका बातमीनुसार, यामागे धोनीची नाराजी हे कारण आहे.

२०१५च्या क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान धोनीने युवराजला टीममध्ये स्थान दिले नव्हते. यावेळी युवराजचे पिता योगराज सिंह धोनीवर जाम भडकले होते. केवळ इतकेच नाही, तर संतापाच्या भरात धोनीवर त्यांनी बरीच आगपाखड केली होती. इतकी की, धोनीला त्यांना रावण संबोधले होते. युवराजला हे कळल्यावर त्याने सोशल मीडियावर धोनीची माफीही मागितली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना मला नेहमीच आनंद वाटतो. भविष्यातही असेच असेल, असे तो म्हणाला होता. पण धोनीने युवराजचे हे टिष्ट्वट वा त्याच्या पित्याच्या टीकेवर कुठलेही उत्तर दिले नव्हते. कदाचित धोनी हीच गोष्ट अद्यापही विसरू शकलेला नाही. त्यामुळेच युवराजच्या लग्नाला न जाणेच त्याने योग्य समजले असावे.

Web Title: Why did Dhoni stay away from Yuvraj's marriage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.