​कोण पूर्ण करणार आलियाचे स्वप्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 16:04 IST2016-11-03T16:04:25+5:302016-11-03T16:04:25+5:30

अलीकडे आलिया भट्ट हिने तिची एक इच्छा बोलून दाखवली. तुझा बॉलिवूडमधील ड्रिम रोल काय, असे तिला एका मुलाखतीत विचारण्यात ...

Who will fulfill the dream of Aliya? | ​कोण पूर्ण करणार आलियाचे स्वप्न?

​कोण पूर्ण करणार आलियाचे स्वप्न?

ीकडे आलिया भट्ट हिने तिची एक इच्छा बोलून दाखवली. तुझा बॉलिवूडमधील ड्रिम रोल काय, असे तिला एका मुलाखतीत विचारण्यात आले. यावर आलियाने ‘अ‍ॅक्शन’ हेच अपेक्षित उत्तर दिले. मला एखादा अ‍ॅक्शनपट करायचाय,असे ती म्हणाली. ‘किल बिल’ माझी आवडती हॉलिवूड अ‍ॅक्शन मुव्ही आहे. हा चित्रपट मला खूप आवडतो. अशाच एखाद्या चित्रपटात फुल टू अ‍ॅक्शन करण्याचे माझे स्वप्न आहे. तुम्हाला हा विनोद वाटेल. कारण अ‍ॅक्शन करण्यासाठी तशी शरिरयष्टी आणि आक्रमकता हवी आणि माझ्याकडे हे सगळं नाही. त्यामुळे कदाचितच मला अ‍ॅक्शनपटात भूमिका मिळेल, असेही ती म्हणाली.
खरे तर करण जोहर हा आलियाचा ‘बॉलिवूड मेंटर’ आहे. त्यामुळे आलियाचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्याचीच. पण शेवटी आलियाने आपली बॉडी लँग्वेज कितीही चेंज केली तरी करण तिचे हे स्वप्न करू शकेल, याची शक्यता नाही. कारण करण हा रोमॅन्टिक चित्रपटांचा ‘बादशहा’ आहे. अ‍ॅक्शन आणि करणचा दूरदूरपर्यंत कुठलाही संबंध नाही. मग काय? अ‍ॅक्शन करायचीच तर आलियाला दुसºया कुण्या निर्माता वा दिग्दर्शकाकडे जावे लागणार.
करणच्याच ‘स्टुंडट आॅफ दी ईयर’मधून आलियाने बॉलिवूड डेब्यू केले होते. करणच्या या चित्रपटानंतर आलियाने कधीच मागे वळून पाहिले नाही. अनेक चित्रपटांमधून तिने वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. लवकरच आलिया गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटात शाहरूख खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यात शाहरूख तिचा मेंटर दाखवण्यात आला आहे.

Web Title: Who will fulfill the dream of Aliya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.