हर्षवर्धनसोबतची ‘ती’ कोण??
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 17:37 IST2016-06-18T11:51:44+5:302016-06-18T17:37:48+5:30
सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूर ‘मिर्झा’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. हर्षवर्धनच्या या बॉलिवूड डेब्यूबद्दल हर्षवर्धनपेक्षा त्याची बहीण सोनमच अधिक ...
.jpg)
हर्षवर्धनसोबतची ‘ती’ कोण??
स नम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूर ‘मिर्झा’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. हर्षवर्धनच्या या बॉलिवूड डेब्यूबद्दल हर्षवर्धनपेक्षा त्याची बहीण सोनमच अधिक उत्सूक आहे. वेळोवेळी सोनमने हे बोलूनही दाखवले आहे.पण आत्ताची बातमी हर्षवर्धनच्या आगामी सिनेमाविषयी नाही तर त्याच्या आयुष्यातील ‘मिस्ट्री गर्ल’विषयी आहे. होय, अलीकडे हर्षवर्धन एका ‘मिस्ट्री गर्ल’सोबत डिनर डेट एन्जॉय करताना दिसला. आणखी विशेष म्हणजे, या ‘मिस्ट्री गर्ल’ने फोटोग्राफर्सपासून स्वत:चा चेहरा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि ती या प्रयत्नात बºयापैकी यशस्वीही झाली. हर्षवर्धन मात्र कॅमेºयापुढे अगदी कूल दिसला. आता कॅमेºयांपुढे जाण्यास कचरणारी हर्षवर्धनसोबत दिसलेली ‘ती’ कोण, हे कळायला मार्ग नाही.
![]()