मिथुन चक्रवती यांचं पहिलं लग्न अवघ्या ४ महिन्यात मोडले होते, एअरहॉस्टेसच्या पडलेले प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 06:30 PM2023-06-21T18:30:52+5:302023-06-21T18:31:56+5:30

मिथुन चक्रवर्तीच्या दुसऱ्या पत्नीबद्दल म्हणजेच योगिता बालीबद्दल लोकांना माहिती आहे, पण त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

where is mithun chakraborty first wife helena luke separated after 4 months of marriage yogita bali souten now flight attendant | मिथुन चक्रवती यांचं पहिलं लग्न अवघ्या ४ महिन्यात मोडले होते, एअरहॉस्टेसच्या पडलेले प्रेमात

मिथुन चक्रवती यांचं पहिलं लग्न अवघ्या ४ महिन्यात मोडले होते, एअरहॉस्टेसच्या पडलेले प्रेमात

googlenewsNext

बॉलिवूडचा ‘डिस्को डान्सर’ म्हणून एकेकाळी लोकांनी ज्याला डोक्यावर घेतलं तो हिरो म्हणजे मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty). उत्तम अभिनयासह आपल्या हटके डान्स स्टाइलमुळे मिथुनने 80-90 चा काळ चांगलाच गाजवला. त्या काळात त्याचा 'डिस्को डान्सर' हा त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. 'मृगया' चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. असे म्हटले जाते की त्या काळात निर्माता-दिग्दर्शक मिथुनला चित्रपटात खूप लकी मानायचे. त्यामुळेच निर्माता-दिग्दर्शकांसोबतच बॉलिवूड अभिनेत्रीही मिथुन चक्रवर्तीसोबत काम करण्यास उत्सुक होत्या. 

मिथुन चक्रवर्तीच्या दुसऱ्या पत्नीबद्दल म्हणजेच योगिता बालीबद्दल लोकांना माहिती आहे, पण 'डिस्को डान्सर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिथुनच्या पहिल्या पत्नीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? अभिनेत्याशी घटस्फोट घेतल्यानंतर ती चित्रपट जगतापासून दूर गेली आणि आता ती परदेशात स्थायिक झाली. 

योगिता बालीच्या प्रेमात पडण्यापूर्वी मिथुन चक्रवती ल्यूक या विदेशी मॉडेलच्या प्रेमात होते. हेलेनाने 'आओ प्यार करें', 'दो गुलाब' आणि 'साथ साथ' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटांमध्ये काम करताना मिथुन आणि हेलेना ल्यूकशी भेट झाली. पहिल्याच भेटीत प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी 1979 मध्ये लग्न केले, पण लग्नाच्या 4 महिन्यांनंतरच मिथुन चक्रवर्ती आणि हेलेना ल्यूक विभक्त झाले.

घटस्फोटानंतर एका मुलाखतीत मिथुन चक्रवर्तीसोबतच्या लग्नाबाबत हेलेना ल्यूकने अनेक धक्कादायक दावे केले होते. ती म्हणाली होते की, कदाचित हे लग्न झाले नसतं ते बरं झालं असतं. मिथुन यांनी माझे ब्रेनवॉश केलं आणि मला विश्वास दिला की तेच माझ्यासाठी आहेत. यामध्ये ते यशस्वीही झाला.

स्टारडस्टशी बोलताना हेलेना ल्यूक म्हणाली, 'मी मिथुन चक्रवर्तीकडून घटस्फोट मागितला होता. ते आज स्टार झाले असेल, तरी माझा प्लॅन बदलणार नाही. तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस झाला तरी मी त्याच्याकडे परत जाणार नाही. मी त्याच्याकडून पोटगीही मागितली नाही. हे माझ्यासाठी एक दुःस्वप्न होते, जे आता संपले आहे. 


मिथुनपासून घटस्फोट घेतल्यानंतर हेलेना ल्यूकही आयुष्यात पुढे गेली. बॉलिवूडशी संबंध तोडल्यानंतर हेलेना ल्यूक कुठे आहे आणि ती काय करत आहे हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. ती इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर सक्रिय नसली तरी फेसबुकवर सक्रिय राहते. हेलेनाचा लूक आणि स्टाइल आता खूप बदलली आहे. ती आता न्यूयॉर्कमध्ये राहते आणि डेल्टा एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करते.
 

Web Title: where is mithun chakraborty first wife helena luke separated after 4 months of marriage yogita bali souten now flight attendant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.