चिमुकल्या आहिलला कडेवर घेऊन मामा सलमान खान नेमका चालला कोठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 18:51 IST2017-04-18T13:21:15+5:302017-04-18T18:51:15+5:30
सलमान खान आणि त्याचा भाचा आहिल शर्मा यांच्यात एक वेगळ्याच प्रकारची बॉन्डिंग असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आहिलच्या बर्थ ...

चिमुकल्या आहिलला कडेवर घेऊन मामा सलमान खान नेमका चालला कोठे?
स मान खान आणि त्याचा भाचा आहिल शर्मा यांच्यात एक वेगळ्याच प्रकारची बॉन्डिंग असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आहिलच्या बर्थ डेला हजेरी लावण्यासाठी तब्बल २२ तासांचा सलमानने प्रवास केला होता. त्यावरून सलमान आहिलवर किती प्रेम करतो हे दिसून येते. आता दोघांमधील बॉन्डिंग दर्शविणारा असाच एक फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये चिमुकला आहिल मामा सलमानच्या कडेवर बसलेला असून, तो मामाची कंपनी चांगलाच एन्जॉय करीत आहे. शिवाय हा फोटो बघून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, सलमान फ्यूचरमध्ये एक चांगला पिता बनू शकतो.
काही दिवसांपूर्वीच सलमान खान आणि त्याची फॅमिली आहिलचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईहून मालदीवला पोहोचले होते. यावेळी सलमानची कथित गर्लफ्रेण्ड यूलिया वंतूरही उपस्थित होती. यावेळी जल्लोषात आहिलचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला होता. सध्या सलमानने त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे मुंबई येथे शूटिंगचे दुसरे शेड्यूल पूर्ण केले असून, सध्या त्याच्या ‘द बंग टूर’मध्ये व्यस्त आहे.
सध्या सलमान त्याच्या टीमबरोबर हॉँगकॉँगमध्ये असून, त्याच्याबरोबर बहीण आणि भाचा आहिलही असल्याची शक्यता आहे. कारण हा फोटो हॉँगकॉँगमधीलच असल्याचे फोटोतील बॅकग्राउंडवरून स्पष्ट होते. सलमान कुठल्यातरी शॉपिंग मॉलमध्ये आहिलला घेऊन फिरत असल्याचे बघावयास मिळते. सलमानसोबत आहिल एवढा रिलॅक्स दिसत आहे की, तो त्याच्या मामूला किती कनेक्ट आहे, हेच यावरून स्पष्ट होते. मात्र मामू सलमान आपल्या चिमुकल्या भाच्याला नेमका कोठे घेऊन जात आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
![]()
दरम्यान, सध्या त्याची एक्स गर्लफ्रेण्ड कॅटरिना कैफ हिच्यासोबत ‘टायगर जिंदा है’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन असून, त्याला हॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंट डायरेक्टर टॉम स्ट्रुथर्स यांचा टच मिळाला आहे. टॉमने ‘द डार्क नाइट राइज’ आणि ‘एक्स मॅन-फर्स्ट क्लास’ यांसारख्या हॉलिवूडपटांमध्ये स्टंट्स डायरेक्शन केले आहेत.
‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट २०१२ चा सुपरहिट चित्रपट ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. हा चित्रपट यावर्षाच्या अखेरपर्यंत ख्रिसमसनिमित्त रिलीज केला जाणार आहे. सलमान आणि कॅटरिनाची जोडी पहिल्यापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.