लेकीच्या कोणत्या कारनाम्यामुळे कमल हासन झाले नाराज ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 11:40 IST2017-03-15T06:10:06+5:302017-03-15T11:40:06+5:30
अभिनेता कमल हासन यांची लेक आणि अभिनेत्री श्रुती हसन. आपल्या अदा आणि बोल्ड लूकमुळे श्रुती कायमच चर्चेत असते. याशिवाय ...

लेकीच्या कोणत्या कारनाम्यामुळे कमल हासन झाले नाराज ?
अ िनेता कमल हासन यांची लेक आणि अभिनेत्री श्रुती हसन. आपल्या अदा आणि बोल्ड लूकमुळे श्रुती कायमच चर्चेत असते. याशिवाय आपल्या रिलेशनशिपमुळेही श्रुती गॉसिप कॉर्नरवर हिट ठरली आहे. साऊथचा अभिनेता सिद्धार्थसोबत अफेअर होतं. बराच काळ दोघांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर श्रुती आणि सिद्धार्थ लिव्ह-इनमध्ये राहत असल्याच्याही चर्चा होत्या. त्यातच काही दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीसह अभिनेत्री श्रुती हसनचे फोटो व्हायरल झाले. या फोटोतील हा अनोळखी व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून श्रुतीचा बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चा रंगल्यात. सोशल मीडियावर हा फोटो इतका व्हायरल झाला की तिच्या अफेअरच्या खुमासदार चर्चांना ऊत आला. या फोटोत श्रुती उघडपणे आणि बिनधास्त आपल्या कथित बॉयफ्रेंडसह फिरत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र श्रुतीचे वडील म्हणजेच अभिनेता कमल हासन खुश नसल्याचं समोर आलंय. लेक श्रुतीला बॉयफ्रेंड मायकल कोर्सेलसह असं फिरताना पाहून कमल हासन चांगलेच चिंतेत आहेत. श्रुती हसनच्या या लिंकमुळे कमल हासन नाराज झालेत. या कथित लिंक-अपमुळे आपल्या प्रतिमेला धक्का लागेल अशी भीती बहुदा कमल हासन यांना सतावतेय.या संदर्भात कमल हासन यांनी श्रुतीशीही बातचीत केली असून त्याचा काहीही फायदा झाला नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता आपल्या वडिलांची इमेज सांभाळण्यासाठी श्रुती आपल्या बॉयफ्रेंडला सोडणार की नाही?