लग्नाच्या आदल्या रात्री असं काय झालं की सोनमला कोसळलं रडू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 14:14 IST2018-05-08T08:40:46+5:302018-05-08T14:14:01+5:30

बॉलिवूडची मस्सकली सोनम कपूर ही रेशीमगाठीत अडकली आहे.बॉयफ्रेंड आनंद आहुजासह तिचं शुभमंगल थाटात पार पडलं.तिच्या विवाहसोळ्यासाठी अवघं तारांगण भूतलावर ...

What happened in the night before the wedding that Sonam cries! | लग्नाच्या आदल्या रात्री असं काय झालं की सोनमला कोसळलं रडू !

लग्नाच्या आदल्या रात्री असं काय झालं की सोनमला कोसळलं रडू !

लिवूडची मस्सकली सोनम कपूर ही रेशीमगाठीत अडकली आहे.बॉयफ्रेंड आनंद आहुजासह तिचं शुभमंगल थाटात पार पडलं.तिच्या विवाहसोळ्यासाठी अवघं तारांगण भूतलावर अवतरल्याची भावना रसिकांमध्ये निर्माण झाली.कारण सोनमचं संगीत, मेंहदी आणि लग्नसोहळ्याला बॉलिवूडच्या बड्या बड्या तारे तारकांनी हजेरी लावली. सोनमच्या लग्नामुळे अवघं बॉलिवूड आनंदित झाले आहे.कपूर घराण्याच्या आनंदाला तर पारावारच उरलेला नाही. लेकीच्या लग्नात तर पापा अनिल कपूर चांगलेच थिरकलेत.नवदाम्पत्य सोनम आणि आनंदही भलतेच खुश आहेत.प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळाले.मात्र सात फेरे घेण्याआधीच्या रात्री नववधू सोनमच्या मनात घालमेल सुरु होती.कोणत्याही काळजीमुळे नव्हे तर आपल्या जवळच्या आणि लाडक्या व्यक्तींपासून दूर जाण्याची हुरहूर सोनमला लागली.ज्या वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळली, ज्या आईकडे प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट केला, त्यांनी कधीही कोणती गोष्ट कमी पडू दिली नाही अशांपासून दूर जाण्याच्या कल्पनेनेच सोनमच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. जुन्या बालपणीच्या आठवणींमुळे सोनमला गहिवरुन आलं होतं.कोणत्याही सामान्य मुलीची लग्नात जशी अवस्था असेल तशीच सोनमचीही झाली होती.आनंदसह रेशीमगाठीत अडकल्यानंतर सोनमच्या आयुष्याची सुरुवात झाली आहे.तिच्या आनंदातच संपूर्ण कपूर कुटुंबीयांचा आनंद आहे.त्यामुळंच की काय संपूर्ण कपूर कुटुंब सोनमच्या लग्नात उत्साही,आनंदात थिरकल्याचेही पाहायला मिळाले.आम्हीसुद्धा या नवदाम्पत्याला नांदा सौख्य भरे अशाच शुभेच्छा देऊ.

Also Read:सोनम कपूरच्या 'या' लेहंग्याची किंमत ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल!


cnxoldfiles/a>दिल्लीत जंगी रिसेप्शन दिले जाणार आहे.लग्नानंतर सोनमला लगचेच हनीमूनला जाता येणार नाही आहे. कारण सोनमच्या प्रोफेशनल कमिटमेंट्स आणि बिझी शेड्यूलमुळे त्यांना हनीमूनला जायला बराच कालावधी लागणार आहे. सोनम कपूरला 14 मे रोजी होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामिल व्हायचे आहे. दरवर्षी प्रमाणे सोनम याही वर्षी आपल्या हटके अंदाजात रेडकार्पेटवर हजेरी लावणार आहे.यानंतर त्याला चित्रपटाचे प्रमोशन आणि शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ऑक्टोबर किंवा  नोव्हेंबरमध्ये ती हनीमूनला जाणार आहे.

Web Title: What happened in the night before the wedding that Sonam cries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.