श्रीदेवीला हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर नेमके काय घडले? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 16:37 IST2018-02-25T10:59:13+5:302018-02-25T16:37:51+5:30

सुपरस्टार श्रीदेवीच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शौक व्यक्त केला जात आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी श्रीदेवीचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन ...

What happened after Sridevi got the heart attack? Learn! | श्रीदेवीला हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर नेमके काय घडले? जाणून घ्या!

श्रीदेवीला हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर नेमके काय घडले? जाणून घ्या!

परस्टार श्रीदेवीच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शौक व्यक्त केला जात आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी श्रीदेवीचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. दुबईत श्रीदेवीच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम केले जात असून, सायंकाळी उशिरापर्यंत जेट विमानाने श्रीदेवीचे पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे. याचदरम्यान श्रीदेवीच्या निधनासंबंधी एक माहिती समोर येत असून, जे जाणून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

सुरुवातीला अशी बातमी समोर आली होती की, श्रीदेवीला हृदयविकाराचा झटका आला अन् त्यानंतर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता यूएईमध्ये असलेल्या भारताचे राजदूत नवदीप सूरी यांनी श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल अशी काही माहिती सांगितली, ज्यामुळे श्रीदेवीच्या तमाम चाहत्यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 



भारतीय राजदूत नवदीप सूरी यांनी सांगितले की, हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर श्रीदेवी बाथरूममध्ये पडली. याचदरम्यान अशी बातमी समोर येत आहे की, श्रीदेवीला रात्री ११ वाजताच हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यावेळी श्रीदेवी हॉटेलमधील रूममध्ये एकटीच होती. 

श्रीदेवीच्या निधनानंतर तिचे दीर आणि प्रसिद्ध अभिनेता संजय कपूरने खिलजी टाइम्सला सांगितले की, जेव्हा श्रीदेवीचे निधन झाले तेव्हा ती हॉटेलमधील रूममध्येच होती. तिच्या निधनामुळे आम्हाला सर्वांना धक्का बसला आहे. श्रीदेवीला हृदयासंबंधी कुठलाही आजार नव्हता. अशात ही घटना घडणे आमच्यासाठी खूपच धक्कादायक आहे. 

Web Title: What happened after Sridevi got the heart attack? Learn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.