​‘पिंक’नंतर काय करतेय, किर्ती??

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 12:31 IST2016-10-18T12:31:25+5:302016-10-18T12:31:25+5:30

‘पिंक’ या तुमच्या-आमच्या पसंतीत उतरलेल्या चित्रपटातील ‘फलक’ आठवतेयं. होय, अर्थात किर्ती कुलहारी. ‘पिंक’ने किर्तीला कधी नव्हे इतकी प्रसिद्धी मिळवून ...

What do you do after 'Pink', Kirti ?? | ​‘पिंक’नंतर काय करतेय, किर्ती??

​‘पिंक’नंतर काय करतेय, किर्ती??

िंक’ या तुमच्या-आमच्या पसंतीत उतरलेल्या चित्रपटातील ‘फलक’ आठवतेयं. होय, अर्थात किर्ती कुलहारी. ‘पिंक’ने किर्तीला कधी नव्हे इतकी प्रसिद्धी मिळवून दिली. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले. पण ‘पिंक’ नंतर किर्ती काय करतेयं? हे जाणून घेण्यास तुम्हीही उत्सूक असाल. तर किर्ती सध्या एका नामवंत दिग्दर्शकाच्या प्रोजेक्टमध्ये बिझी झालीय. हा दिग्दर्शक म्हणजे मधूर भांडारकर. होय, मधूर भांडारकरसोबत काम करणे, अनेकांचे स्वप्न असते. किर्तीचे हे स्वप्न पूर्ण झालेय. मधूरच्या ‘इंदू सरकार’ या चित्रपटात किर्ती दिसणार आहे. ‘पिंक’मधील किर्तीचा अभिनय पाहून मधूर चांगलाच प्रभावित झाला. इतका की, ‘इंदू सरकार’साठी त्याने किर्तीला साईन केले. ‘इंदू सरकार’ हा इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणीच्या कालखंडातील घटनाक्रमाची पार्श्वभूमी असलेला सिनेमा आहे. चित्रपटाचे नाव ‘इंदू सरकार’ असले तरी  इंदिरा गांधींशी त्याचा संबंध नाही. येत्या नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु होत आहे. दिल्ली आणि पुणे येथे हे शूटींग होणार आहे. निश्चितपणे किर्ती या चित्रपटाबद्दल उत्सूक आहे. ‘पिंक’नंतर माझ्यातील कलाकाराला आव्हान देणारी भूमिकाच मला हवी होती. ‘इंदू सरकार’ने माझी ही इच्छा पूर्ण झाली. मधूरसोबत काम करणे माझे स्वप्न होते, तेbackdrop of emergency during Indira Gandhi.ही पूर्ण झाले, असे किर्ती म्हणाली,ते म्हणूनच!

Web Title: What do you do after 'Pink', Kirti ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.