​शाहरुख-सलमान-आमिरमध्ये कसल्या गप्पा रंगतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 10:50 IST2016-11-04T10:48:15+5:302016-11-04T10:50:31+5:30

खान त्रिकुटामध्ये आता चांगलीच मैत्री फुलल्याचे दिसतेय. एकेकाळी तिघांना एकत्र पाहण्याचा कोणी विचारही करू शकत नव्हते. परंतु आता ते ...

What is the chat between SRK and Salman? | ​शाहरुख-सलमान-आमिरमध्ये कसल्या गप्पा रंगतात?

​शाहरुख-सलमान-आमिरमध्ये कसल्या गप्पा रंगतात?

न त्रिकुटामध्ये आता चांगलीच मैत्री फुलल्याचे दिसतेय. एकेकाळी तिघांना एकत्र पाहण्याचा कोणी विचारही करू शकत नव्हते. परंतु आता ते एकमेकांसोबत अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत आणि कौटुंबिक समारंभात सोबत असतात. मग अशावेळी भेटल्यावर ते नेमके काय बोलत असतील? कशाबद्दल गप्पा मारत असतील असा प्रश्न तुम्हाला कधी पडला?

हो ना? तर मग याचे उत्तर नुकतेच शाहरुखने दिले. तो म्हणतो की, ‘आम्ही भेटल्यावर स्टारडमबद्दल कधीच बोलत नाही. उलट आम्ही मिळून लोकांसाठी काय करू शकतो याविषयी चर्चा करतो. बरं हे झाले केवळ चांगल्या गोष्टी. सामान्य मित्रांप्रमाणे ‘रंगीन’ गप्पासुद्धा करतो.’

५१ व्या वाढदिवसानिमित्त तो सांगत होता की, ‘एके दिवशी मी आणि सलमान बसलेलो होतो तेव्हा माझा मुलगा आर्यन तेथे आला. आणि सलमान म्हणाला की, आपण खरंच खूप नशीबवान आहोत. देवाने आपल्याला भरभरून दिले आहे. ज्या वयात लोक निवृत्तीचा विचार करतात, तेथे आपण अजुनही काम करतोय.’

स्टारडम, लोकप्रियता, संपत्ती या गोष्टी माणसाला घडवत नसतात. आपल्या जवळची माणसं आपल्या कॅरेक्टरला आकार देत असतात. आपल्या अतिव्यस्त शेड्यूलमधून मग घरच्यांसाठी वेळ कसा काढतो यावर तो म्हणतो, आमच्या प्रोफेशनमध्ये उशिरा झोपण्याची सवय नसणारे लोक कोणालाच भेटू शकत नाही. म्हणून मग मी असो किंवा सलमान, रात्री उशिरापर्यंत जागे राहून लोकांशी भेटी-गाठी करतो.

THree Khans

शाहरुखच्या अलिबाग येथील नव्या घरी त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बॉलीवूडमधील निवडक सेलिब्रेटी उपस्थित होते. सलमान खान आणि शाहरुख यांच्यासोबत आर्यनसुद्धा बराच वेळ गप्पा मारत होता. या महिन्याच्या शेवटी किंग खानचा ‘डिअर जिंदगी’प्रदर्शित होत आहे.

Web Title: What is the chat between SRK and Salman?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.