सलमान खानच्या फॅन्ससाठी खूशखबर; लवकरच रिलीज होणार ‘ट्यूबलाइट’चा ट्रेलर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 17:15 IST2017-03-26T11:45:06+5:302017-03-26T17:15:06+5:30

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याच्या फॅन्ससाठी आज आम्ही एक खूशखबर सांगणार आहोत. कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाइट’ या बहुचर्चित ...

Well known for Salman Khan's fans; 'TubeLight' trailer to be released soon! | सलमान खानच्या फॅन्ससाठी खूशखबर; लवकरच रिलीज होणार ‘ट्यूबलाइट’चा ट्रेलर!

सलमान खानच्या फॅन्ससाठी खूशखबर; लवकरच रिलीज होणार ‘ट्यूबलाइट’चा ट्रेलर!

लिवूडचा दबंग स्टार सलमान खान याच्या फॅन्ससाठी आज आम्ही एक खूशखबर सांगणार आहोत. कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाइट’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. सध्या कबीर याच्या चित्रपटाच्या एडिटिंगवर काम करीत असून, लवकरच फर्स्ट लुक रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. 

कबीन खान यांनी सांगितले की, ‘ट्यूबलाइट’विषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे, त्यामुळे याचे ट्रेलर लवकरच रिलीज केले जाणार आहे. यावेळी कबीर खान याने ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाबाबतही माहिती दिली. ‘एक था टायगर’चे दिग्दर्शन केलेल्या कबीरच्या मते ‘टायगर जिंदा हैं’ जबरदस्त अ‍ॅक्शन चित्रपट ठरणार आहे. चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ बघावयास मिळणार असल्याने दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. ‘टायगर जिंदा हैं’चे दिग्दर्शन अली अब्बास जफर करीत आहे. 



कबीर यांनी म्हटले की, ‘मला आनंद होत आहे की, टायगरच्या दुसºया भागाचे शूटिंग सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा सलमान आणि कॅटरिना प्रेक्षकांना एकत्र बघावयास मिळणार आहेत. अली अब्बास जफर यांनी चित्रपटासाठी अतिशय चांगल्या लोकेशन्सची निवड केल्याने अ‍ॅक्शनचा धमका बघावयास मिळेल हे निश्चित असल्याचेही कबीर यांनी सांगितले.  

कबीरच्या पुढच्या चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास तो अभिनेता हृतिक रोशन याच्याबरोबर चित्रपट निर्मिती करीत आहे. याबाबतची आॅफिशियल अनाउंसमेंट अद्यापपर्यंत होणे बाकी आहे. या चित्रपटासाठी हृतिकबरोबर कॅटरिना, दीपिका पादुकोण आणि क्रिती सॅनन यांचे नाव समोर आघाडीवर आहेत. मात्र अद्यापपर्यंत यातील एकाही अभिनेत्रीचे नाव निश्चित झालेले नाही.  

Web Title: Well known for Salman Khan's fans; 'TubeLight' trailer to be released soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.