Watch Video : जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ताने बेड सिन्स देत केली ‘खुजली’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 18:15 IST2017-04-01T12:45:37+5:302017-04-01T18:15:37+5:30

​दिग्दर्शक सोनम नायर यांच्या लघुपटात काम करीत असलेले अभिनेता जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना बघावयास मिळणार आहेत.

Watch Video: Jackie Shroff and Nina Gupta give 'bed scans' | Watch Video : जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ताने बेड सिन्स देत केली ‘खुजली’

Watch Video : जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ताने बेड सिन्स देत केली ‘खुजली’

ग्दर्शक सोनम नायर यांच्या लघुपटात काम करीत असलेले अभिनेता जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना बघावयास मिळणार आहेत. या लघुपटाचे नाव ‘खुजली’ असे असून, ज्यामध्ये दोघेही बिनधास्त भूमिकेत बघावयास मिळत आहेत. ‘खुजली’ हा लघुपट मिडल एज कपल्सच्या फॅटेंसीवर आधारित आहे. 

सोनम नायर यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटात जॅकी आणि नीना एका मॅरिड कपलच्या भूमिकेत आहेत. मुलाचा सांभाळ आणि आईची देखभाल करण्याच्या व्यापात हे दोघेही एकमेकांसोबत वेळ व्यतीत करणे विसरून जातात. कथेत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा जॅकीला मुलाच्या रूममध्ये हॅण्डकफ मिळतो. ज्यामुळे नीना त्याला ‘फिफ्टी शेड्स आॅफ ग्रे’ बुकविषयी सांगते. पुढे दोघेही त्यांची फॅटेंसी पूर्ण करण्यासाठी बेडरूममध्ये जातात. वास्तविक यावेळेस त्यांना अनेक अडचणी येतात. मात्र अशातही नीना आणि जॅकी या दिवसाला त्यांच्या आयुष्यातील बेस्ट डे म्हणून संबोधतात. 



आयएएनएस या न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत जॅकीने म्हटले की, ‘खुजली’ एक सुंदर आणि काळजाला भिडणारा लघुपट आहे. जेव्हा मला सोनम नायरने या लघुपटाची कथा ऐकविली तेव्हा मी लगेचच चित्रपटासाठी होकार दिला. मी टेरिबिली टिनी टॉकीजबरोबर (टीटीटी) काम करण्याचा आनंद घेतला. चित्रपटातील बेड सिन्सविषयी जॅकीने सांगितले की, जेव्हा दिग्दर्शक हातात चाबूक घेऊन उभा असतो तेव्हा अभिनेत्याला अशाप्रकारचे सिन्स करणे सोपे जाते. या लघुपटात जॉकी आणि नीनाचा जबरदस्त हॉट अंदाज बघावयास मिळत आहे. 

Web Title: Watch Video: Jackie Shroff and Nina Gupta give 'bed scans'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.