WATCH: उडे दिल बेफिक्रेची मेकिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 09:58 IST2016-11-07T16:28:13+5:302016-11-08T09:58:21+5:30
गाण्याचा ‘मेकिंग व्हिडिओ’ आज रिलीज झाला.

WATCH: उडे दिल बेफिक्रेची मेकिंग
णवीर सिंह आणि वाणी कपूर यांच्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. चित्रपटाचा ट्रेलर बघून प्रेक्षकांची उत्सूकता वाढली आहे. तसेच चित्रपटाचे टायटल सॉन्ग ‘उडे दिल बेफिक्रे’ सुद्धा सर्वांच्या ओठावर आहे. याच गाण्याचा ‘मेकिंग व्हिडिओ’ आज रिलीज झाला.
या गाण्यासाठी रणवीर व वाणीने दिलेले ‘हॉट’ शॉट्स पॅरिसच्या थंडीत ‘आग’ लावणारे आहेत. अनेक शॉट्ससाठी रणवीरला शर्टलेस व्हावे लागले. अशावेळी पॅरिसच्या हुडहुडी भरवणा-या थंडीत त्याची काय अवस्था झाली, हे हा व्हिडिओ पाहूनच आपल्याला कळू शकते.
आम्हाला थंडीने हुडहुडी भरलेली असायची आणि आदि सर (आदित्य चोप्रा) आमच्यासमोर येऊन ‘तुम्हाला थंडी जाणवत नाहीय...कारण तुम्हाला माहितीय काय सुरु आहे..थंडी जाणवली तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसेल...,’ असे बजावत असत, असे रणवीर या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतो आहे.
या गाण्यात वाणीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. याबद्दल वाणी या व्हिडिओत भरभरून बोलताना दिसते. मी यात कधी नव्हे इतके सुंदर नाचलेय. अर्थात असे मला वाटतेय. पण याचे सगळे श्रेय वैभवी मर्चंट या माझ्या कोरिओग्राफरला जाते, असे ती सांगतेय.
‘उडे दिल बेफिक्रे’मध्ये रणवीर-वाणीची हॉट केमिस्ट्री पहायला मिळते. गाण्याच्या सुरुवातीपासूनच दोघेही एकमेकांना दम देताना दिसतात. वाणी कपूरचा बोल्ड व रणवीरचा जबरदस्त अंदाज या गाण्याला आणखीच मजेदार बनवितो. हे गाण्याला संगीतकार विशाल पंकज यांनी संगीतबद्ध केले असून बेनी दयाल व सोफी चौधरी यांनी हे गाणे गायले आहे.
‘बेफिक्रे’ हा या वर्षातील बॉलिवूडमधील सर्वांत बोल्ड चित्रपट असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटाद्वारे तब्बल आठ वर्षांनंतर आदित्य चोपडा दिग्दर्शनात परतले आहेत. गत महिन्यात पॅरिसच्या आयफेल टॉवरहून या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता.