Watch Trailer : ‘सीक्रेट सुपरस्टार’चा ट्रेलर रिलीज; फंकी अंदाजात दिसला आमीर खान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 03:37 PM2017-08-02T15:37:26+5:302017-08-02T21:10:06+5:30

‘सीक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये एका मुलीची गायक बनण्यासाठीची धडपड दाखविण्यात आली आहे.

Watch Trailer: 'Secret Superstar' trailer release; Aamir Khan looks at the funk! | Watch Trailer : ‘सीक्रेट सुपरस्टार’चा ट्रेलर रिलीज; फंकी अंदाजात दिसला आमीर खान!

Watch Trailer : ‘सीक्रेट सुपरस्टार’चा ट्रेलर रिलीज; फंकी अंदाजात दिसला आमीर खान!

googlenewsNext
लिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याने गेल्या सोमवारी त्याच्या आगामी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताना चित्रपटाविषयीची माहिती दिली होती; मात्र आता प्रेक्षकांसाठी चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये एका मुलीची गायक बनण्यासाठीची धडपड दाखविण्यात आली आहे. चित्रपटाची कथा एका छोट्या मुलीच्या सिंगिंग करिअरवर आधारित आहे. तिला तिचा आवाज जगासमोर पोहोचवायचा असतो; मात्र वडिलांचा विरोध असल्यामुळे तिला याकरीता लढा द्यावा लागतो. तेथूनच तिचा संघर्ष सुरू होतो. पुढे ती सुपरस्टार बनते. 

दरम्यान, ट्रेलर अंगावर शहारे आणणारा असून, चित्रपटाची कथा दमदार असल्याचे दर्शवितो. ज्या मुलीला सिंगिंगमध्ये करिअर करून सुपरस्टार व्हायचे असते, ती मुलगी वडीलांच्या विरोधामुळे वापरत असलेली युक्ती बघणे रोमांचक ठरते. बुरखा घालून स्वत:च्या आवाजाचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड केल्यानंतर ज्या पद्धतीने तिच्या नावाचा सर्वत्र डंका वाजतो, ते बघताना प्रेक्षक नक्कीच रोमांचित होतील यात दुमत नाही. या छोट्या मुलीच्या भूमिकेत जायरा वसीम बघावयास मिळत आहे. 



चित्रपटात आमीर खान सुपरस्टारच्या भूमिकेत असून, त्याचे नाव शक्ती असते. आमीर या चित्रपटात एकदमच हटके लूकमध्ये दिसत आहे. त्याने ३१ जुलै रोजीच चित्रपटाचे एक पोस्टर ट्विटवर रिलीज केले होते. पोस्टरमध्ये एक लहान मुलगी स्कुल बॅग घेऊन पुलावरून एकटीच जात असताना दिसत होती. हे पोस्टर बघून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. कारण या मुलीच्या स्कूलबॅगमध्ये एक माइक दिसत असल्याने, प्रेक्षकांच्या मनात याविषयी गुढ निर्माण झाले होते. अखेर त्याचा आता उलगडा झाला आहे. दरम्यान, या चित्रपटात जायरा वसीम, मेहर विज आणि आमीर खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जायराने आमीरबरोबर या अगोदर ‘दंगल’ या चित्रपटात काम केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करीत आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलीज केला जाणार आहे. दरम्यान, चित्रपटाविषयी चाहत्यांच्या मनात असलेली उत्सुकता पाहता, बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरेल, असेच काहीसे दिसत आहे. 

Web Title: Watch Trailer: 'Secret Superstar' trailer release; Aamir Khan looks at the funk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.